Monday, December 23, 2024
Homeराज्यकिट्सचे प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सम्मानित...

किट्सचे प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सम्मानित…

रामटेक – राजू कापसे

महाराष्ट्र रत्न पुरस्कार हा विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कार्याबद्दल तसेच योगदानाबद्दल दरवर्षी सिने अर्क प्रॉडक्शन्स,मुंबई तर्फे दिला जातो. इंजिनियरिंग तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे यांना अमृत भवन, सीताबर्डी,नागपूर येथे एका दिमाखदार सोहळ्यात यावर्षीचा हा पुरस्कार रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 ला देण्यात आला.

प्राचार्य डॉ श्रीखंडे कवि कुलगुरु इंस्टीट्यूट ऑफ़ टेक्नॉलॉजी अँड सायन्स( किट्स) रामटेक येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याबद्दल सुपरिचित आहेत. ते एक प्रशिद्ध गायक आहेत. डॉ श्रीखंडे यांना मिळालेल्या बहुमूल्य पुरस्काराबद्दल किट्सचे सचिव व्ही. श्रीनिवासराव, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

त्यांच्या या यशात आईवडिलांचा आशीर्वाद ,पत्नी डॉ. सौ. मालती व सुपुत्र तन्मय यांची साथ मिळाल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी चर्चा करतांना सांगितले. त्यांचे नातेवाईक, सहकारी,मित्र परिवार यांनी सर्वांनी कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: