मूर्तिजापूर प्रतिनिधी
मूर्तिजापूर – वारकरी साहित्य परिषदेच्या येथील शाखेच्या वतीने बुधवारी (ता.१८) येथील लाल शाळे (जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय) च्या मैदानावर निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराजांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कीर्तन सोहळा स्थळाचे व भव्य मंडपाचे भूमीपूजन तालुकाध्यक्ष अजाबराव वहिले महाराजांच्या हस्ते व मार्गदर्शक आनंद वानखडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. इंदुरीकर महाराज हे विख्यात समाजप्रबोधनपर कीर्तनकार आहेत. त्यांच्या प्रबोधनाचा तालुकावासियांना लाभ व्हावा, या एकमेव उद्देशाने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी संपूर्ण नियोजन व व्यवस्थेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती यावेळी आनंद वानखडे यांनी दिली. खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध तिडके, अरविंद पोळकट, गजानन वैद्य, साहेबराव राऊत, साहेबराव
ढाकरे, गणेशराव महल्ले, साहेबराव जळमकर, गजानन चौधरी, अरुण कातखेडे, प्रमोद उमाळे, रामेश्वर वाघमारे, डॉ. रवींद्र लांडे, ज्ञानेश्वर वानखडे, राकाँ शहराध्यक्ष राम कोरडे, निजाम इंजिनियर, इब्राहिम घाणीवाला, राजेंद्र मोहोड, सविनय गुल्हाने, श्रीधर कांबे, मंगेश कुकडे, तेजस जामठे, अॅड. शेखर वाकोडे, नरेश विल्हेकर, रंजना सदार, विष्णू लोडम, बबलू वानखडे, निखील ठाकरे, विशाल शिरभाते, उदय शिंदे, रवी माडकर, आनंद पवार, गजानन सवईकर, निखील गाढवे, प्रकाश सोनोने, सुगत तायडे, रुपेश कामले, विलास सावळे उपस्थित होते.तसेच अबप इंदुरीकर महाराज यांच्या मूर्तिजापूर येथील 18 सप्टेंबर च्या कीर्तन / कार्यक्रमाला हजारो च्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आनंद उर्फ पिंटू वानखडे यांनी केले…