Kirit Somaiya Video : गेल्या आठवड्यात लोकशाही या वृत्तवाहिनीने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आणून संपूर्ण राज्यातच नव्हे देशात खळबळ उडवून दिली होती तर तो व्हिडिओ खरा आहे कि बनावट आहे याबाबत राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. तर आता एक मोठी अपडेट समोर आली असून तो व्हिडिओ सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून मिळाल्याचे लोकशाही वृत्तवाहिनीने सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी लोकशाही वृत्त वाहिनेने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही चांगलेच गाजले होते.याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे.
व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचं आढळलं आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप लावले होते. याबाबत विरोधीपक्षनेते यांनी विधिमंडळाच्या सभागृहात सभापती यांना पेनड्राईव्ह दिला होता, तसेच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र आता पुढे काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.