Monday, December 23, 2024
Homeराजकीयकिनवट | उपाध्यक्ष वेंकट यांच्या प्रभागातील सौर पथदिव्यांचा कामात भ्रष्टाचार...अनेक निकृष्ट पथदिवे...

किनवट | उपाध्यक्ष वेंकट यांच्या प्रभागातील सौर पथदिव्यांचा कामात भ्रष्टाचार…अनेक निकृष्ट पथदिवे दोन दिवसातच बंद…

शुभम शिंदे, किनवट

महाराष्ट्रामध्ये दिव्याखाली अंधार ही म्हण फार प्रसिद्ध आहे आणि या म्हणीला जिवंत करणार ताज उदाहरण म्हणजे किनवट नगर परिषदेचे उपाध्यक्ष वेंकट नेम्मानिवार यांचा प्रभाग क्रमांक 1 सध्या किनवट नगर परिषदेतील सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून जाता-जाता वेंकट यांनी आपल्या कामाने प्रभागात प्रकाश पाडण्याचा दिखावा केला.

रामनगरचा प्रभाग क्रमांक 1 हा किनवटचा सर्वात जुना रहिवाशी भाग अशी याची ओळख आहे। परंतु असे असूनही नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुख सुविधांपासून रामनगर वंचित असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। इथे असणाऱ्या नागरिकांना ज्या पाण्याचा पुरवठा केला जातो त्या पाण्याच्या बोअर शेजारीच मोठं गटार आहे आणी याच गटारातील पाण्याचा निचरा होऊन हे पाणी परत नागरिकांपर्यंत पोहचत ज्याचा अर्थ येथील लोकप्रतिनिधी नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत। असो तर आपला मूळमुद्दा होता प्रभागात बसवण्यात आलेले सौर पथदिवे प्रभाग क्रमांक 1 मध्ये बसवण्यात आलेल्या या पथदिव्यांचा काम हे जवळपास 82 लक्ष रूपये एवढ्या किंमतीच असून ‘इलेक्टरा सोलार सिस्टम’ या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे। आणि यातही मजेशीर बाब म्हणजे ह्या कंपनीच नाव हे कागदोपत्री असून मूळ कॉन्ट्रॅक्ट हे स्वतःहा वेंकट नेम्मानिवार यांनी घेतलंय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे।

स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताचा एक किस्सा आहे।भारतात इंग्रजांच शासन होत आणि त्यावेळी भारतात दुष्काळ पडला होता,शेतकऱ्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, ज्यामुळे काही शेतकरी राणीकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की देशात दुष्काळ पडलाय आणि आमच्याकडे खायला भाकरी नाही त्यामुळं आमची मदत करा त्यावर राणी हसली आणि म्हणाली एवढंच….तर तुम्ही भाकरी ऐवजी ब्रेड आणि केक खा। हा किस्सा सांगण्याचं तात्पर्य एवढंच की राजेशाहीमध्ये राजाला आणि लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला तुमच्या प्रश्नांची आणि समस्येची जाण असली पाहिजे नाहीतर आपली ही परिस्थिती त्या दुष्काळग्रस्त शेतकाऱ्यांप्रमाणे होते। आणि प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांची झाली सुद्धा.

प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांची मूळ समस्या ही येथील रस्ते आहेत। या रस्त्यांच्या मागणीसाठी नागरिकांनी अनेकदा वेंकट नेमानिवर यांच्याशी संपर्क केला त्यांचे दार ठोठावले पण त्या मागणीकडे त्यांनी कधी लक्षच दिल नाही। तर जिथे रस्ते नाहीत तिथे पथदिवे बसवून ब्रिटनच्या राणीप्रमाणे कारभार करत असल्याची प्रचिती दिली। प्रभागात बसवण्यात आलेल्या सौर खांबांची संख्या ही जवळपास 700 असल्याची माहिती हे खांब बसवणार्या मजुरांनी दिली,परंतु हे 700 खांब नेमके कुठे बसवले आहेत हे आमच्यातरी निदर्शनास आलेलं नाही।

ज्या ठिकाणि हे खांब बसवण्यात आले आहेत त्या ठिकाणी खरच हे खांब बसवण्याची गरज होती का? हे आपण स्वतःहा वरील फोटोत पाहू शकता. ज्या ठिकाणी हे खांब बसवण्यात आले आहेत, त्या खांबातील अंतर हे जास्तीत-जास्त 30 फूट तर कमीतकमी 1 फूट पेक्षाही कमी एवढं आहे। हो हे खरं आहे, या बसवण्यात आलेल्या खांबातील कमीत-कमी अंतर हे 1 फूट पेक्षाही कमी आहे। तर बसवण्यात आल्याच्या 2 दिवसांच्या आताच यातील अनेक पथदिवे हे बंद पडल्याचं चित्र आहे। तर बसवण्यात आलेल्या पथदिव्यांचा प्रकाश हा रस्त्यांवर नाही तर समोरील घरांवर पडतोय हे स्वतःहा येथील नागरिक सांगत आहेत।

तर मग असे असतानाही या निकृष्ट पथदिव्यांकडे आणि या पथदिव्यांचे काम घेणाऱ्या कंपनीला अधिकारी वा लोकप्रतिनिधी जाब का विचारात नाहीयेत? असा प्रश्न उपस्थित होतोय। वेंकट यांच्याच कार्यकाळात याअगोदरही सौर पथदिवे बसवण्याचा काम करण्यात आलं होतं,पण त्या पथदिव्यांच पुढे काय झालं? त्यांची योग्य निगा राखल्या गेली का? अगोदर बसवण्यात आलेलं बहुतांश पथदिवे हे बंद आहेत मग आणखी हे सौर पथदिवे बसवून जनतेच्या पैशांचा हा अनाठायी खर्च कुणाची हुजरेगिरी करण्यासाठी केला जातोय?

प्रभागात करण्यात आलेल्या या निकृष्ट कामसंदर्भात आम्ही वेंकट यांच्याशी संपर्क केला,पण त्यांच्याकडून उत्तर आलं नाही। त्यामुळे आत्ता जरी यांच्याकडून उत्तर येत नसेल तरी येत्या निवडणुकांमध्ये आम्हीच मतपेटीतून वेंकट यांना योग्य उत्तर देऊ असा निश्चय येथील नागरिकांनी केला आहे। तरी सदर प्रकरणात नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार हा तहसीलदार यांच्याकडे दिल्याने त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता 4 तासांच्या प्रतीक्षेनंतरही त्यांनी नंतर या असे उत्तर दिले।

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: