पातूर – निशांत गवई
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचा दहावी चा निकाल नुकताच जाहीर झाला. या दहावीच्या निकालात इंग्रजी माध्यमातून पातूर तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून अव्वल येण्याचा मान पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ने मिळवला आहे.
किड्स पॅराडाईज चा शंभर टक्के निकाल लागला असून तृप्ती खरात हिने 95.40 गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर यथार्थ चव्हाण 94.40 टक्के गुण मिळवून दुसरा तर सिद्धी पाकदुने हिने 94.20 टक्के गुण मिळवून तिसरा येण्याचा मान मिळवला आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.
यामध्ये ऋषिकेश अमानकर 94 टक्के, प्रतीक अत्तरकार 94 टक्के, कृष्णा अत्तरकार 93.80 टक्के, पार्थ तेलंगडे 93.60 टक्के, श्रेया तेलंगडे 93.40 टक्के, क्रिष्टी चिकटे 93.40 टक्के, रिधिमा गांजरे 92.60 टक्के, ऋषिकेश तायडे 92 टक्के, ओम बंड 92 टक्के, ओम अत्तरकार 92 टक्के, यश चिकटे 91.80 टक्के, प्रणाली दळवी 91.60 टक्के,
निखिल कावळे 91.20 टक्के, चेतन ठाकरे 90.40 टक्के, अलबर अहमद खान 90.40 टक्के, आरती तायडे 90.20 टक्के, स्नेहल लोथे 90.20 टक्के, आदित्य राठोड 89.60 टक्के, कृष्णा नागरे 89.60 टक्के, मो. अम्मार शेख 86.20 टक्के, निशिगंधा मेतकर 85.80 टक्के, मोहम्मद सुफी 76.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांचा सत्कार किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांनी केला. यावेळी शाळेचे शिक्षक नरेंद्र बोरकर, हरिष सौंदळे, अविनाश पाटील, बजरंग भुजबटराव यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शुभम पोहरे, रुपाली पोहरे, मधुकर बोदडे यांनी परिश्रम घेतले.