सांगली – ज्योती मोरे
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या सुमारे 1 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी ज्याच्याकडे गुंतवणूक केली होती. त्याच्या भावालाच 5 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुपवाड मधील लाड शाळेजवळील घरासमोरून काही अनोळखी व्यक्तींनी जबरदस्तीने शिफ्ट गाडीत घालून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. याबाबत वैष्णवी प्रणव पाटील यांनी, आपल्या नवर्याचे अपहरण झाले असल्याची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत निशाणदार, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाढवे यांचे एक पथक तयार केले होते.
सदर पथकाच्या माध्यमातून तपास करत असताना खास बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की कुपवाड मधून प्रणव नामदेव पाटील यांचे अपहरण राजू काळे सह सहा जणांनी केले असून, त्यास विट्यातून तासगाव मार्गे कुठेतरी घेऊन जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विटा तासगाव रोडवरील नवीन बायपास रोडवर तपास पथकांनी सापळा रचून राजू रावसाहेब काळे वय 28 राहणार शरद नगर, कुपवाड, सागर सुखदेव कोळेकर वय 33 राहणार वाघमोडे नगर कुपवाड, किरण शंकर लोखंडे व 23 राहणार बामनोली,
सोन्या उर्फ बापू हरी येडगे वय 27 राहणार बामनोली, संदेश रामचंद्र घागरे वय 19 राहणार वाघमोडे नगर कुपवाड, आणि कल्पेश दिनकर हजारे वय वर्षे 21 राहणार वाघमोडे नगर कुपवाड अशा सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीत अपहरण झालेले प्रणव नामदेव पाटील हेही आढळून आले.
या आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 1 लाख 11 हजारांचे सहा मोबाईल विना नंबरची सुमारे साडेतीन लाख रुपयांची निळ्या रंगाची स्विफ्ट गाडी तसंच गाडीच्या डिकीत बांबूची दोन दांडकी, एक कोयता, एक सुरा असा एकूण चार लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींकडे चौकशी केली असता, अपहरण करण्यात आलेल्या प्रणव नामदेव पाटील यांचा भाऊ पंकज पाटील याच्याकडे शेअर मार्केटमध्ये एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्या पैशांची वारंवार मागणी करूनही वसुली होत नसल्याच्या रागातून त्याचा भाऊ प्रणव पाटील याचं अपहरण केल्याची सागर कोळेकर याने कबुली दिली आहे.सदर गुन्ह्यातील सर्व आरोपींना पुढील तपासासाठी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाढवे, अच्युत सूर्यवंशी,
निलेश कदम, संदीप गुरव, संदीप नलावडे, राजाराम मुळे, बिरोबा नरळे, संदीप पाटील, सचिन कनप, जितेंद्र जाधव, संजय पाटील, राहुल जाधव ,शशिकांत जाधव, सागर लवटे, नागेश खरात, ऋतुराज होळकर ,सोहेल कार्तियानी, अजय बेंद्रे, इमरान मुल्ला, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, तसेच कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातील शिवानंद गव्हाणे, गजानन जाधव, संदीप पाटील, प्रदीप भोसले, सतीश माने ,महादेव नागणे ,निलेश कोळेकर आदींनी केली आहे.