Saturday, November 23, 2024
Homeराज्यखोपटा-उरण पुलाला भगदाड...

खोपटा-उरण पुलाला भगदाड…

पनवेल – किरण बाथम

सततच्या जड – अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे जुन्या खोपटा पुलाला भगदाड पडल्याची घटना शुक्रवारी ( दि- ४) रात्रीच्या सुमारास घडली.या घटनेचे माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांनी तातडीने सदर खोपटा पुलाची पाहणी करून पुलावरील भलामोठा खडा भरण्याचे काम हाती घेतले आहे.

उरण पुर्व विभागाला उरण शहरांशी जोडणाऱ्या खोपटा पुलाची उभारणी ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बँ.ऐ.आर.अंतुले यांनी केली होती.त्या खोपटा ( जुन्या) पुलावरून प्रवाशी वाहना बरोबर २० ते३० टन क्षमतेच्या वाहनांची वर्दळ होऊ शकते असे आवाहन उरण तहसील व सार्वजनिक बांधकाम विभाग उरण कडून सातत्याने करण्यात आले आहे.

परंतु जुन्या खोपटा पुलावरून मोठ्या प्रमाणात ६० ते ८० टन क्षमतेच्या मालानी भरलेल्या जड- अवजड वाहनांची वाहतूक ही उरण तहसील, उरण पोलीस ठाणे, उरण वाहतूक पोलीस आणि आर टी ओ चे अधिकारी वर्गाच्या संगनमताने राजरोसपणे सुरू आहे.

त्यामुळे त्याचा त्रास हा जुन्या खोपटा पुला बरोबर प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशी नागरीकांना सहन करावा लागत आहे.
जुन्या खोपटा पुलावरील सततच्या जड- अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे शुक्रवारी ( दि५) पुलावर भगदाड पडल्याची घटना घडली आहे.प्रवाशी नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली आहे.

या घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग उरण चे उप अभियंता नरेश पवार यांना मिळताच त्यांनी खोपटा पुलाची पाहणी करून सदर भला मोठा खड्डा भरण्याचे काम आता हाती घेतले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: