Sunday, December 22, 2024
Homeराज्यखोडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा...

खोडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा…

रामटेक – राजू कापसे

रामटेक तालुक्यातील काचुरवाही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खोडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 4 जुलै रोजी शाळा पुर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्ग पहिली मध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन खाऊ वाटप करण्यात आले तसेच त्यांच्याकडून वस्तुंची ओळख करून त्यांना अभ्यासाबाबद विचारणा करण्यात आली.

यावेळी सरपंचा सविता सुभाष नागोसे, माजी सरपंच शिशुपाल अतकरे, शा. शि. अध्यक्ष अंबादास गायकवाड अध्यक्ष, दिगांबर आडकने, पितांबर पानतावणे,कोमेंद्र लसुंते, योगेश आडकने, विनोद गायकवाड, तसेच शाळेचे मुख्याध्यापक कोडवती सर, शिक्षक वरठी सर, लक्ष्मी आडकने, अनिता खेरगडे , भारती पानतावणे, लताबाई बोबडे, तसेच गावातील महिला पुरुष पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: