Sunday, December 22, 2024
Homeराज्यप्रभाग क्रमांक आठ मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात रथसप्तमीनिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम...

प्रभाग क्रमांक आठ मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकात रथसप्तमीनिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न…

सांगली – ज्योती मोरे

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे रथसप्तमी निमित्त महिला सहस्नेह मेळावा व हळदीकुंकू समारंभ करण्यात आला,यावेळी अहिल्यादेवी यांच्या मूर्तीला अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात केली.

महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, सौ अनिता विष्णू माने, नगरसेविका संगीता खोत, नगरसेविका संगीता हारगे, व आदी उपस्थित होते,यावेळी खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला,यामध्ये 27 महिला विजेत्या ठरल्या व पैठणी च्या मानकरी सौ संगीता गडदे, (विवेकानंद हाउसिंग सोसायटी), व क्रमांक दोनच्या मानकरी निर्मला स्वामी (विनायकनगर), क्रमांक तीन स्मिता वायदंडे (पोलीस कॉलनी) ह्या विजेत्या ठरल्या.

यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची समता नगर आरोग्य केंद्रास पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण स्टाफ चा सत्कार करण्यात आला, तसेच अष्टविनायकनगर येथील किरण बंडू चव्हाण यांची भूमी अभिलेख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी सहाय्यक आयुक्त खरात , अभिजीत हारगे, ज्योती सर्वदे, वंदना सवाखंडे, दत्तात्रय लोकरे, डॉक्टर विनोद माडवी, सौ जयश्री उमेश पाटील व प्रभागातील हजारोंच्या संख्येत महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: