खामगाव – हेमंत जाधव
राज्यशासनाच्या वतिने ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यन्त विविध योजनांचा महसुल व वन विभागाचा पंधरवाडा आयोजित केलेला आहे. महसूल पंधरवडा अंतर्गत तहसील कार्यालय खामगाव येथे आज दिनांक 12/ 8 /2024 रोजी दिव्यांग एक हात मदतीचा या अंतर्गत आजच पदभार घेतलेले तहसीलदार सुनिल पाटिल साहेब यांचे प्रमुख ऊपस्थितीत तसेच यावेळी ऊपस्थित असलेले नायब तहसिलदार सर्वश्री देविदास देठे,विजय पाटील,प्रदिप जाधव ,निखील पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
सर्व प्रथम आज दि.१२/०८/२०२४ ला नवनियुक्त आजच पदभार घेतलेले तहसिलदार श्री सुनिल पाटिल यांचे पुश्पगुच्छ देत स्वागत केले. दिव्यांग बांधवांना अडचणी असतिल तर त्या तत्काळ निकाली काढण्यास तहसिल प्रशासन सज्ज राहिल तहसिल विभागातुन मिळत असलेल्या रेशन विभागाच्या अंतोदय व अन्न सुरक्षा याविषयी नायब तहसिलदार प्रदिप जाधव यांनी तर संजय गांधी विभागातील योजनेविषयी माहिती नायब तहसिलदार देविदास देठे यांनी दिली तर नवनियुक्त तहसिलदार सुनिल पाटील यांच्या हस्ते औपचारिक स्वरुपात अंतोद्यय योजने,अं
तर्गत अद्यावत शिधापञिका ,आरोग्य सुविधेसाठी महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे प्रमाणपञ,संजय गांधी योजने अंतर्गत निराधार योजनेचे मंजुरी प्रमाणपञ यावेळी दिव्यांगांना वितरित करण्यात आले. यावेळी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक,प्रहारचे शहरअध्यक्ष क्षञुधन ईंगळे,दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे,मधुकर पाटील,
प्रणिता देवगिरीकर,कविता ईंगळे,सुनिता गोरले,वसंत चिखलक, वैभव सांभारे,गजानन काळे,विश्वनाथ सातव,विनोद पवार,अनिल मोरे ,विनोद ईटनारे आदी यावेळी ऊपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन नायब तहसिलदार निखील पाटिल यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसिलदार प्रदिप जाधव यांनी केले. या दिव्यांगांच्या कार्यक्रमासाठी तहसिल प्रशासनाने सुयोग्य पद्दतिने नियोजन करित कार्यक्रम संम्पन्न करण्यात आला.