Sunday, December 22, 2024
Homeराज्यबुलढाणा जिल्ह्यातिल सर्वात मोठ्या खामगाव तालुक्यात महात्मा फुले योजनेचा लाभ नाहीच... महात्मा...

बुलढाणा जिल्ह्यातिल सर्वात मोठ्या खामगाव तालुक्यात महात्मा फुले योजनेचा लाभ नाहीच… महात्मा फुले आरोग्य योजना सुरु करा – मनोज नगरनाईक

खामगाव – बुलढाणा मध्ये सर्वात मोठा तालुका खामगाव असलेल्या ठिकाणी शासनाची जिवन संजिवनी ठरणारी महात्मा फुले जन आरोग्य योजना ही फक्त आणि फक्त शासकिय सामान्य रुग्णालयात निवासी डाँक्टर असलेले सोनटक्के यांचे हाँस्पिटल व साई हाँस्पिटल येथे लहान बाळाच्या ऊपचारा करिताच कार्यान्वित आहे.परंतु महात्मा फ़ुले योजने मध्ये असलेले विविध दुर्धर आजार या करिता खामगाव व आजुबाजूच्या तालुक्यातील गोरगरिब जनतेला अकोला वा ईतर शहरामध्ये धाव घ्यावी लागत आहे.

यामध्ये आर्धिक दुर्बल घटकाला संजिवनी ठरणारी योजना यामध्ये जवळपास तिन लक्ष रुपयेची तरतुद असल्याने खाजगी रुग्णालयामध्ये मिळणार्‍या सुविधेचा लाभ या दिनदुर्बल घटकाला घेता येतो
याकरिता पिवळे ,केशरी रेशन कार्ड धारक पात्र ठरतात बुलढाणा जिल्ह्यातील घाटवर व घाटाखाली अशी विभागणी असल्याने घाटाखाली खामगाव येथे मोठी हाँस्पिटल ऊपलब्द असतांनाही हि योजना नसल्याने या गोरगरिब जनतेसह सामान्य जनतेला आर्थिक,मानसिक वा शारिरीक त्रास सहन करत बाहेर गावाचा रस्ता धरावा लागत आहे,

विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील औद्यौगिक,व्यवसाईक व्यापाराचे सर्वात मोठे स्थान खामगाव शहराला आहे जवळपास जिल्ह्याचा कारभार येथुनच चालतो याठिकाणी औषधोपचारासाठी गोरगरिब जनतेला वेद्यकिय आधार शासनाचेवतिने महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना चालु केली आहे परंतु हि योजना खामगाव शहरामध्ये फक्त लहान मुलांची दोन रुग्णालय असलेल्या ठिकाणीच चालु आहे,

या योजनेच्या माध्यमातुन मोठीमोठी आजारावर ऊपचार होत असल्याने याचा लाभ केशरी व पिवळे रेशनकार्ड धारकांना मिळावा या करिता खामगाव येथिल,अस्थिरोग,प्रसुतीग्रुह सह ईतर रुग्णालय असतांनाही हि सुविधा नसल्याने या आरोग्य योजनेचा लाभ घेण्याकरिता बाहेर गावी जाऊन ऊपचार करावा लागत आहे तरी हि योजना खामगाव येथे लवकरातलवकर सुरु करण्याची मागणी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन खामगावचे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत व पालकमंत्री गुलाबराव पाटिल तसेच खासदार प्रतापराव जाधव यांचे कडे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: