खामगाव – हेमंत जाधव
बुलढाणा जिल्हा पँरा ओलंपिक असोसिएशन, नगरपरिषद खामगाव व विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १०/डिसेंबर/२०२३ रविवार भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदान खामगाव येथे बुलढाणा जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे.
या क्रीडा स्पर्धेतील पात्र विद्यार्थ्यांची निवड चाचणी होऊन त्यांना पुढील ध्येय गाठण्याकरिता त्यास त्यांना हातभार लागेल क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ते साध्य करणारा यशातून त्यांचे जीवनमान उंचाविण्यास हातभार लागेल या उदात्त हेतूने विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग संस्थेच्या वतीने बोलणारा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा ज्यामध्ये गोळा फेक भालाफेक थालीफेक कबड्डी 100 मीटर धावणे व तीन चाकी सायकल असे प्रकार या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहे.
सदरील स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त माननीय श्री संदीप जी गुरव बुलढाणा जिल्ह्याचे भूषण शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनुराधाताई सोळंके यास आंतरराष्ट्रीय चॅम्पियन जावेद चौधरी सुनील जी वानखडे व आपल्या अंधत्वावर मात करत पीएचडी प्राप्त करणारे माधवजी गोरे त्यांचा दिव्यांग गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
या दिव्यांगणच्या जिल्हास्तरीय स्पर्धेला महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातून प्रथम सुरुवात करण्यात येत आहे या स्पर्धेचे उद्धाटक बुलढाणा जिल्हा क्रिडा अधिकारी बाळक्रुष्ण महानकर हे राहणार आहेत या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यातील आपल्या क्रीडा क्षेत्रातील कौशल्य दाखवून ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पँरा ओलंपिक क्रीडा नियमावलीनुसार होणार असल्यामुळे या स्पर्धेत निवड होऊन आपला व आपल्या जिल्ह्याचा मान वाढवण्याकरिता अवश्य सहभाग घ्यावा असे संस्थेच्या वतीने अध्यक्ष मनोज नगरनाईक यांचेवतिने कळविण्यात आले आहे या स्पर्धे करता जिल्ह्यातील समस्त दिव्यांग प्रतिनिधी विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव यांचं सहकार्य सहभाग या क्रिडा स्पर्धेला लाभलेलं आहे.