Thursday, December 26, 2024
Homeनोकरीखामगाव | भव्य नौकरी महोत्सव युवकांनी संधीचा लाभ घ्यावा...देवेंद्र देशमुख

खामगाव | भव्य नौकरी महोत्सव युवकांनी संधीचा लाभ घ्यावा…देवेंद्र देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस कडून येत्या ४/०२/२०२३ ला खामगाव येथील आईसाहेब मंगल कार्यालय येथे भव्य नौकरी महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे तरी युवकांनी ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नीट देवेंद्र देशमुख यांनी केले आहे.

सुशिक्षित युवकांना रोजगार मिळावा या प्रामाणिक हेतूने हा नौकरी महोत्सव मागील बारा वर्षांपासून राबविल्या जात आहे या मागे कुठलाही राजकीय उद्देश्य नाही आम्ही नेहमी ८०% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या तत्त्वावर काम करतो, ह्या उपक्रमाच्या माध्यमातून इंडस्ट्रिअल सेक्टर मधे 150 पेक्षा जास्त उमेदवार तर बँकिंग सेक्टर मधे 250 पेक्षा जास्त उमेदवार कार्यरत आहेत.

येणाऱ्या कार्यक्रमात बँकिंग क्षेत्रातील मधील नामांकित बँक तसेच इतर क्षेत्रातील नामांकित कंपन्या येणार आहेत. यासाठी खामगाव शहरात 18 केंद्र नेमण्यात आलेली आहे या केंद्रात उमेदवारांना मुलाखतीसाठी अर्ज तसेच पास मिळणार आहे या साठी उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क घेटल्याजानार नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे युवानेते देवेंद्र देशमुख यांनी दिली

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: