खामगाव – हेमंत जाधव
खामगाव सामान्य रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांगांची अस्थिव्यंग, नेञ, मुकबधिर, कर्ण बधिर, मानसिक, पॅरालिसीस आदी प्रकाराची नियमित तपासणी होत असते याठिकाणी असलेल्या दिव्यांग समस्याच्या अनुशंगाने आज विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन या दिव्यांग संस्थेच्या वतिने जिल्हा शल्यचिकीत्सक बुलढाणा यांना विविध समस्या सोडविण्याकरिता निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये – 1) कर्णबधिर बांधवासाठी असलेल्या तपासणी मशिनकरिता आॅडिओमॅट्री स्पेशाॅलिस्ट ची रछडलेली नीयुक्ती करणे २) दिव्यांग तपासणी बोर्डवर नेञरोग तज्ञ स्पेशाॅलिस्टची नियुक्ति करणे,
३)खामगाव व बुलढाणा येथे न्युरोलाॅजिस्ट व न्युरो स्पेशाॅलिस्ट ची तपासणी करिता महिन्यातील एक दिवस ऊपलब्द ४)दिव्यांग प्रमाणपञ तपासणी झाल्यानंतर ते आठ दिवसात तयार करुन देणे वरिल दिव्यांगांच्या रास्त मागण्या लवकरात लवकर दखल घेऊन सोडविण्यात याव्यात या करिता जिल्हा शल्यचिकीत्सक बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे तर यावेळी विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक प्रहार शहराध्यक्ष शञुघन ईंगळे,
प्रकाश चोपडे अपंग जनता दल अध्यक्ष नांदुरा,निरज जैन,एम के पाटिल,अभय खंडागळे,वसंत चिखलकर,जयश्री सांजोरे, श्रीकांत कल्याणकर आदी हजर होते या निवेदनच्या प्रती पुढिल योग्य कार्यवाहीसाठी आरोग्य ऊपसंचालक अकोला व वैद्यकिय अधिक्षक खामगांव यांना पाठविण्यात आल्या आहेत.