अमरावती – दुर्वास रोकडे
खादी वस्त्र जनसामान्यांना उपलब्ध होण्यासाठी खादी व ग्रामद्योग मंडळाच्यावतीने सोमवार दि. 5 ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत पाच दिवसाचे “खादी महोत्सव” प्रदर्शनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनीमध्ये विविध दर्जेदार खादी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहे. या प्रदर्शनीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील उद्योजकासाठी विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येते. ग्रामीण भागात उद्योग उभारणी केलेल्या खादी व ग्रामोद्योगी वस्तूंना शहरी भागात बाजारपेठ व ओळख मिळवून देण्याचे कार्य मंडळामार्फत केले जाते. प्रधानमंत्री यांनी मन की बात या कार्यक्रमात केलेल्या आवाहनानुसार खादी वस्त्रांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि खादीचा प्रचार, प्रसार व वापर वाढावा यासाठी मंडळ विविध उपक्रम राबवित असतात. त्याअनुषंगाने खादी महोत्सव प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे नागरिकांनी लाभ घ्यावा.