अकोला – संतोषकुमार गवई
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती नागरिकांना मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयातर्फे जनजागृती मेळावा उद्या (15 फेब्रुवारी) वाडेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात होणार आहे. या मेळाव्यात इतरही शासकीय विभाग सहभागी होतील.
मंडळामार्फत पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, मध केंद्र योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ महिला, युवक-युवती, आदिवासी बांधव, सर्व समाजघटकांना व्हावा यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. वानखडे यांनी केले आहे.