Kerala’s Sreeju : अनेक भारतीय काम करण्यासाठी UAE मध्ये राहतात. त्यांच्यापैकी बरेच जण मोठ्या लॉटरी आणि जॅकपॉटसाठी नशीब आजमावतात. अशा परिस्थितीत येथील तेल-गॅस कंपनीत काम करणाऱ्या ३९ वर्षीय केरळच्या श्रीजूने लॉटरीमध्ये नशीब आजमावले. बुधवारी लॉटरी उघडली तेव्हा श्रीजूलाही आश्चर्याचा धक्का बसला. या लॉटरीतून त्यांनी 45 कोटी रुपये जिंकले आहेत. श्रीजूने बुधवारी झालेल्या महाजूझ सॅटरडे मिलियन्स ड्रॉमध्ये हे पैसे जिंकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीजू गेल्या 11 वर्षांपासून यूएईमध्ये राहत आहे. त्याने अजून घरही बांधले नव्हते. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत श्रीजूने सांगितले की, जेव्हा मी माझे खाते तपासले तेव्हा मला आश्चर्य वाटले. मात्र, याची पुष्टी करण्यासाठी मी महजूजच्या कॉलची वाट पाहत होतो. श्रीजूच्या आधीही अनेक भारतीयांनी UAE मध्ये मोठ्या लॉटरी जिंकल्या आहेत. गेल्या शनिवारी यूएईमध्येच केरळच्या सरथ शिवदासनने 11 लाख रुपये जिंकले होते.
अनेक भारतीयांनी लॉटरी जिंकली
याच ड्रॉमध्ये मुंबईच्या मनोज भावसारलाही १६ लाखांची लॉटरी लागली. तो अबुधाबीमध्ये 16 वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्तीचे काम करत आहे. लॉटरी जिंकल्याबद्दल भावसार म्हणाले की, जेव्हा त्यांना अभिनंदनाचा मेल आला तेव्हा मला खूप आनंद झाला. यानंतर मी माझ्या आईला फोन करून लाईव्ह ड्रॉ स्ट्रीम पाहण्यास सांगितले. यानंतर माझे नाव पाहताच ती आनंदाने ओरडली.
https://t.co/aXsyAQEc5c #Kerala Man, Working As Control Room Operator In UAE, Wins ₹ 45 Crore In Lottery
— Hemant Srivastava (@hemant_smile) November 16, 2023