Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीव्हाट्सएप वर स्टेटस ठेवणे पडले महागात; लोहा पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा...

व्हाट्सएप वर स्टेटस ठेवणे पडले महागात; लोहा पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा केला…

नांदेड – महेंद्र गायकवाड

लोहा शहरातील इंदिरा नगर येथील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलवर व्हाट्सएप स्टेटसला आपल्या हातात तलवार असलेला फोटो ठेवला होता हे स्टेटस त्याला महागात पडले असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सध्याच्या डिजिटल युगात सोशलमीडियावर विविध पोस्ट ठेवणे,स्टेटस ठेवणे ही एक प्रकारची फॅशनच झाली आहे.वादग्रस्त पोस्टमुळे अनेकावर गुन्हे दाखल झाले असतानाही सोशलमीडियावर वादग्रस्त पोस्ट ठेवण्याचे व पोस्ट टाकण्याचे प्रमाण कांही कमी होत नाही.

असाच प्रकार लोहा शहरात घडला असून लोहा शहरातील इंदिरानगर येथील एकाने 9 डिसेंबर रोजी विनापरवाना बेकायदेशीर रित्या हातात तलवार घेऊन फोटो काढले व ते आपल्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवले ही माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी संबंधित आरोपीच्या घरची झेडती घेतली असता पोलिसांना सदर व्यक्तीच्या हातात असलेली तलवार घरात सापडली याप्रकरणी सपोन शेख गफार शेख खलील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधिताविरुद्ध लोहा पोलिस ठाण्यात गुरन 237/2022 कलम 4/25 शस्त्र अधिनियम 1959 कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ सूर्यवंशी हे करित आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: