Monday, December 23, 2024
Homeराज्यकवठे महांकाळ एस. टी. आगारात १८ एस.टी. बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण...

कवठे महांकाळ एस. टी. आगारात १८ एस.टी. बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…

सांगली – ज्योती मोरे

सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्वाचा घटक आहे. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुककर प्रवास व्हावा यासाठी कवठे महांकाळ आगारासाठी नवीन 18 एस.टी.बसेस देण्यात आल्या असून या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

कवठेमहांकाळ बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खासदार संजय पाटील, तहसिलदार अर्चना कापसे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, कवठेमंकाळ आगार व्यवस्थापक आश्विनी किरगत, वाहतूक निरीक्षक अजिंक्य पाटील, सहायक वाहतूक निरीक्षक शाहिद भोकरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अजितकुमार गोसराडे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी या नवीन प्राप्त झालेल्या बसेस उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: