Monday, December 23, 2024
Homeराज्य' कविता : तुझी आणि माझी !' समूहातर्फे जागतिक महिलादिनानिमित्त काव्य स्पर्धेचे...

‘ कविता : तुझी आणि माझी !’ समूहातर्फे जागतिक महिलादिनानिमित्त काव्य स्पर्धेचे आयोजन…

“कविता : तुझी आणि माझी!”या सर्वांच्या लाडक्या काव्यसमूहाने पांचगणी येथे दोन दिवसीय काव्यमहोत्सव आणि कविसंमेलन यशस्वीरीत्या पार पाडले. सर्वांच्या मिळणाऱ्या भरघोस प्रेमामुळेच समुहाचे नावलौकिक आणि कौतुक दिवसेंदिवस वृध्दींगत होत आहे. सदर संमेलनापूर्वी आपण अनेक स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन केले होते.

सालाबादप्रमाणे याही वर्षी येत्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या समूहामार्फत “स्त्री गौरवार्थ काव्य लेखन स्पर्धा २०२३” चे आयोजन केले आहे.

सर्वसामान्यतः स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे:

१) विषयाचे नेमके बंधन नाही परंतु सर्व सहभागी स्पर्धकांची कविता ‘महिला’ या विषयाशी संबंधित (महिला सशक्तीकरण, स्त्री शिक्षण, स्त्री सुरक्षा वगैरे वगैरे…) असावी.

२) कवितेचा कोणताही प्रकार.. मुक्तछंदापासून वृत्तबद्ध, गझल, भारुड, पोवाडा…. काहीही चालेल जे पद्य स्वरूपात (आणि विषयाला धरून) असेल.. गद्य स्वरूपातील रचना बाद केली जाईल.

३) दिनांक ८ मार्च पर्यंत रात्री १२.०० पर्यंत कविता पाठवू शकता. एकच कविता पाठवावी.
9405641925 या क्रमांकावर कविता व्हॉट्सॲप करावी.

४) महाराष्ट्रातील तज्ञ मान्यवर कवी/ कवयित्री यांच्या मार्फत स्पर्धेतील कवितांचे परीक्षण केले जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

५) स्पर्धेतील सहभागी सर्वच कवी आणि कवयित्री यांना सहभागाचे आकर्षक डिजिटल सन्मानपत्र मिळेल.

६) विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि डिजिटल सन्मानपत्र मिळेल.

७) स्पर्धा सशुल्क राहील. स्पर्धेचे शुल्क रुपये १००/- (शंभर) इतके आकारण्यात येईल. स्पर्धा शुल्क 9921297001 या क्रमांकावर Google Pay / Phone Pe करून पाठवावे.

८) प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि उत्तेजनार्थ तीन क्रमांक काढण्यात येतील.

९) प्रथम क्रमांकास रोख पारितोषिक रुपये २००१/- आणि डिजिटल सन्मानपत्र,
द्वितीय क्रमांकास रोख पारितोषिक रुपये १५०१/- आणि डिजिटल सन्मानपत्र
तृतीय क्रमांकास रोख पारितोषिक रुपये १००१/- आणि डिजिटल सन्मानपत्र देण्यात येईल.
१०) उत्तेजनार्थ यांना अनुक्रमे ७००/-, ५००/- आणि ३००/- आणि प्रत्येकी डिजिटल सन्मानपत्र देण्यात येईल.

…ज्ञानेश सूर्यवंशी
आणि सर्व प्रशासन व नियंत्रण मंडळ,
कविता : तुझी आणि माझी!

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: