Friday, November 22, 2024
Homeराज्यकविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात त्रिदिवसीय राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे उद्या उद्घाटन...

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात त्रिदिवसीय राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे उद्या उद्घाटन…

राजु कापसे
रामटेक

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक आणि इंडियन सोसायटी फाॅर बुद्धिस्ट स्टडीज् , जम्मू यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन रामटेक येथे दि. 14, 15 व 16 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. बुद्ध साहित्य, तत्त्वज्ञान यावर मंथन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बुद्ध साहित्य, तत्त्वज्ञान यावर मंथन व्हावे हे ही या परिषदेचे प्रयोजन आहे.

या परिषदेसाठी, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, दिल्ली, भारतीय दार्शनिक अनुसंधान परिषद, दिल्ली, भारतीय इतिहास अनुसंधान परिषद्, दिल्ली तसेच केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली यांच्याद्वारे आर्थिक अनुदान प्राप्त झाले आहे.

राष्ट्रीय बुद्धिस्ट परिषदेत भारतभरातून 200 हून अधिक संशोधक, विद्वान् सहभागी होणार
मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले, संपूर्ण भारतातून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तराचे बौद्ध दर्शन व भारतीय दर्शनाचे विद्वान् तीन दिवस या परिषेत शोधपत्रवाचन तसेच शोधसंवादात सहभागी होणार आहेत. या परिषदेतील या शोधसंवादाद्वारे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने मौलिक विचार मांडले जातील. या परिषदेत भारतातील 10 हून अधिक कुलगुरू उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संपूर्ण भारतभरातून 200 हून अधिक प्राध्यापक, विद्वान्, कुलगुरू आणि विद्यार्थी भारतीय दर्शन आणि बौद्ध तत्त्वज्ञान यावर संशोधन निबंध प्रस्तुत करतील. या परिषदेद्वारे नवीन शैक्षणिक धोरणाचा विकास तर होईलच पण मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 2047 च्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यास विश्वविद्यालय उपोद्बलक कार्य करेल असा विश्वासही मा. कुलगुरू प्रो. त्रिपाठी यांनी व्यक्त केला.

मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेचे संयोजक प्रो. प्रसाद गोखले, संचालक, विद्यापीठ नियोजन विकास मंडळ आहेत. या परिषदेचे उद्घाटन उद्या शनिवार, दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी डाॅ. कमलाकर तोतडे सभागृह रामटेक येथे संपन्न होणार आहे.

या उद्घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी या नात्याने 24 व्या वार्षिक बुद्धिस्ट परिषदेचे अध्यक्ष प्रो. मुरली मनोहर पाठक, मा. कुलगुरू, लाल बहादूर शास्त्राी राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली प्रो. अरविंद जामखेडकर, कुलपती , जे जे स्कूल आॅफ आर्टस्, मुंबई, प्रो. बैद्यनाथ लाभ, मा. कुलगुरू, सांची युनिव्र्हसिटी आॅफ बुद्धिस्ट अॅंड इंडिक स्टडीज्, सांची विशेष अतिथी या नात्याने उपस्थित राहणार आहे.
विशेष अतिथी या नात्याने प्रो. सी. जी. विजयकुमार, मा. कुलगुरू, महर्षी पाणिनी संस्कृत तथा वैदिक विश्वविद्यालय, उज्जैन, सारस्वत अतिथी या नात्याने प्रो. महेश देवकर, विभाग प्रमुख, पाली व बुद्धिस्ट स्टडी सेंटर, पुणे विद्यापीठ, पुणे उपस्थित राहतील. इंडियन सोसायटी फाॅर बुद्धिस्ट स्टडीज् चे अध्एयक्ष प्रो. सत्यप्रकाश शर्मा, प्रो. उदई चंद्र जैन, विश्वस्त, प्रो. रत्ना बासू, निवृत्त प्रोफेसर, कलकत्ता विद्यापीठ, इंडियन सोसायटी फाॅर बुद्धिस्ट स्टडीज् चे उपाध्यक्ष प्रो. ललितकुमार गुप्ता, सचिव प्रो सरस्वती मुटसडी, कोषाध्यक्ष डाॅ. सुरेश कुमार, संयुक्त सचिव प्रो. अंबालिका सूद जेकब उपस्थित राहतील.

विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय आणि सदर परिषदेचे स्थानिक सचिव प्रो. प्रसाद गोखले विशेषत्वाने उपस्थित राहतील.

विश्वविद्यालयात येत्या तीन दिवसात पाली भाषा व साहित्य , बुद्धिस्ट संस्कृत भाषा व साहित्य, अपभ्रंश साहित्यातील बुद्धिझम, केंद्रीय आणि पूर्वआशियातील भाषा व साहित्य, बुद्धिझमचा इतिहास, बौद्ध तत्त्वज्ञान, तौलनिम बुद्धिझम, महाराष्ट्रातील बुद्धिझम, बुद्धिझम आणि न्युरो सायन्स इ. अनेक विषयांवर संपूर्ण भारतातील100 हून अधिक विद्वान्, प्राध्यापक, संशोधक शोधनिबंध सादर करणार आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: