Sunday, December 22, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांच्या मदतीसाठी नर्चरडॉटफार्मद्वारे ‘कवच भाव गॅरंटी’...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नर्चरडॉटफार्मद्वारे ‘कवच भाव गॅरंटी’…

नर्चरडॉटफार्म या भारतातील अग्रगण्य कृषी-तंत्रज्ञान कंपनीने बाजारभावातील चढ-उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी अद्वितीय उत्पादन ऑफरिंग लॉन्च केले आहे. हे उत्पादन ऑफरिंग कंपनीचा प्रमुख उपक्रम ‘कवच’चा भाग म्‍हणून लॉन्च करण्यात आले आहे आणि त्‍याला ‘भाव गॅरंटी’ म्हणतात.

कवच भाव गॅरंटी उत्पादनाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे वाजवी मूल्य मिळवून देणे आणि किंमतीत चढ-उतार झाल्यास होणारे आर्थिक नुकसान कमी करणे हे आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी मंडीच्या किंमतींचा अंदाज बांधणे कठीण असताना या किंमती मोठ्या प्रमाणात चलनांवर अवलंबून असतात.

नर्चरडॉटफार्मने रिस्क कव्हर यंत्रणा तयार केली आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या अंतिम उत्पादनाच्या किंमतीतील चढउतारांची भरपाई दिली जाते. भाव गॅरंटी उत्पादन ऑफरिंगच्या फायद्यांमध्ये निर्देशांक आधारित ट्रिगर, कमी वितरण विंडो आणि नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्याचा समावेश आहे.

नर्चरडॉटफार्मचे सीओओ व व्यवसाय प्रमुख श्री. ध्रुव साहनी म्हणाले, “कवच भाव गॅरंटी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे आणि शेतीला शाश्वत व व्यवहार्य बनवण्याच्या आमच्या ध्येयाशी संलग्न आहे. कवच भाव गॅरंटीसह आम्ही जोखीम कमी करण्यामध्ये, जोखीम कव्हर प्रीमियम्स कमी करण्यामध्ये, परताव्याची हमी आणि पर्यायाने शेतकरी स्थिरता शक्य करण्यामध्ये यशस्वी होऊ. हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी तयार केले आहे आणि किंमतीतील चढउतारांपासून आर्थिक सुरक्षिततेची खात्री देईल.”

नर्चरडॉटफार्मने अद्वंतचे राधिका, जानी किंवा रत्न या ब्रॅण्‍डची ओक्रा (भेंडी) बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कवच भाव गॅरंटी सुरू करण्याकरिता अद्वंत सीड्ससोबत सहयोग केला आहे. शेतकरी नर्चरडॉटफार्म अॅप डाऊनलोड करू शकतात आणि भेंडीच्या बियांच्या पॅकवर उपलब्ध असलेला क्‍यूआर कोड स्कॅन करून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय या कव्हरचा लाभ घेऊ शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: