सांगली – ज्योती मोरे
नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री राजेंद्र नागरगोजे (अध्यक्ष.महाराष्ट्र राज्य परिषद पुणे, मिरज हायस्कूल मिरज मुख्याध्यापक )लाभले होते. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री.अधिकराव पवार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना कुंभार उपस्थित होत्या.
तमसो मा ज्योतिर्गमय या उक्ती प्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन संत कबीर महादेवी वर्मा प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ वंदना कुंभार यांनी करून दिला. हिंदी दिनानिमित्त प्रशालेतील कु.बिस्मिल्ला अष्टेकर, कु .अमृता अजेटराव , कु.व्यंकटेश मालगावे ,कु.श्रीदत्त कांबळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेतले सहाय्यक शिक्षिका सौ. सुनीता भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की हिंदी केवळ भाषा नाही तर एक मनाची भाषा आहे. काश्मीर ते कन्याकुमारी या प्रांतानुसार तसेच साहित्य ते मनोरंजन सिनेमा पर्यंत संवादाची भाषा म्हणून ओळखली जाते.हिंदी हमारी आन है, हिंदी हमारी शान है! हिंदी हमारी चेतना, वाणी का शुभ वरदान है! हिंदी हमारी वर्तनी, हिंदी हमारा व्याकरण, हिंदी हमारी संस्कृती, हिंदी हमारा आचरण!
समर्पक शब्दात हिंदीचे महत्त्व त्यांनी सांगितले.
शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ.सरिता पाटील यांनी हिंदी सप्ताह निमित्त आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की सर्व भाषांमध्ये हिंदी ही सर्वात गोड भाषा व मन की भाषा म्हणून ओळखली जाते . मुळातच हिंदी भाषा ही संस्कृत या प्राकृत भाषेतून तयार झालेली आहे. तसेच हिंदी भाषेला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र नागरगोजे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की हिंदी दिनानिमित्त शाळेमध्ये जो हिंदी सप्ताह या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये जे विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते ते खरोखरच कौतुकास्पद होते. आपल्या संपूर्ण देशाला एकसंध पणे बांधून ठेवण्याचे काम हिंदी भाषेमुळे झालेले आहे.ज्या परकीयांनी आपल्या देशावर राज्य केले त्यांना परतून लावण्यासाठी हिंदी भाषेमधून विविध प्रेरणात्मक लिखाण करण्यात आले.
पूर्व परंपरा अंतर्गत चालत आलेल्या अनेक अंधश्रद्धा खोडून लोकजागृती करण्याचे काम संत कबीर यांच्या दोहो या साहित्य प्रकारातून झालेले आहे. हिंदी भाषा ऐकायला छान वाटते पण बोलताना आपण अडखळतो जरा पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हिंदी भाषेचा वापर केला तर खऱ्या अर्थाने हिंदीचा या भाषेचा प्रसार व प्रचार होण्यास मदत होईल.
शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार हिंदी सप्ताह निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे विवेचन करताना म्हणाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंदी दिनानिमित्त 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या सप्ताहामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी हिंदी दिनानिमित्त भरवलेला प्रदर्शनाची चित्रफिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून मुलांना दाखवण्यात आली. ही प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापकांनी यापूर्वीच्या हिंदी सप्ताहाला प्रदर्शित केलं होतं.
यानंतर पुढे सात दिवस विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये निबंध स्पर्धा, कविता गायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पहा आणि ओळखा, बडबड गीत, अनुवाद लेखन, पोस्टर प्रदर्शन विशेष म्हणजे या सर्व स्पर्धां हिंदी या राष्ट्रभाषेतूनच घेण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
घटना समितीने राजभाषा हिंदी विषयक विधेयक 14 सप्टेंबर 1949 ला घोषित केले. त्यानुसार 14 सप्टेंबर हा दिवस देशभर हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. वस्तुतः महाराष्ट्राच्या पुरता विचार केला तर महाराष्ट्राने पूर्वीपासूनच हिंदीला आपले मानले आहे . घटनेनुसार हिंदी राष्ट्रभाषा नसून राजभाषा आहे केंद्र सरकारची कार्यालय सार्वजनिक उपक्रम राष्ट्रीयकृत बँका येथे हिंदीचा राजभाषेच्या रूपात वापर वाढत आहे.
हिंदी सात राज्यांची राजभाषा आहे. हिंदी फक्त साहित्यातच राहिली नाही तर आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये कामकाजामध्ये प्रामुख्याने पुढे राहिली. आजकाल जीवनामध्ये हिंदीचा वापर तसेच उपयोग वाढत चाललेला आहे त्यामध्ये बोलचालीची हिंदी, व्यापारी हिंदी, कार्यालयीन हिंदी, शास्त्रीय हिंदी ,वैज्ञानिक व तांत्रिक हिंदी ,समाजी हिंदी, साहित्यिक हिंदी, जनसामान्यांच्या माध्यमाच्या युक्त हिंदी अशाप्रकारे हिंदीचा वापर सर्वत्र होत आहे.
माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी आपल्या राज्याच्या कारकिर्दीत हिंदी भाषेतच सर्व सरकारी पत्र व्यवहार होतील असे आदेश काढले. हिंदीला प्रगतीपथापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक विद्वानांनी व आचार्य योगदान दिले आहे त्यामध्ये महावीर प्रसाद, द्विवेदी, उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद, जैनेंद्र, यशपाल, इलाचंद जोशी ,रामचंद्र शुक्ल यांचा समावेश होतो त्यांनी दिलेले योगदान म्हणजे हिंदी भाषेला मिळालेला अविस्मरणीय ठेवा आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हिंदी दिनानिमित्त जे विविध उपक्रम राबवण्यात आलेले होते यामध्ये सागरेश्वर अभयारण्या मध्ये 501 औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण ,कोण बनेगा हिंदी पंडित ,भारत की विविध रंगछटा या अंतर्गत हिंदी पुस्तकांचे प्रदर्शन , आंतर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, जिल्हास्तरीय कविता गायन स्पर्धा यासारखे विविध उपक्रम राबवण्यात आले होते.
फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या हिंदी सुलेखांच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले या परीक्षेसाठी इयत्ता पाचवी ते दहावी मधील सर्व विद्यार्थी परीक्षेत बसले होते. स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेमधील विद्यार्थ्यांचा निकाल खालील प्रमाणे
काव्य गायन स्पर्धा 5 वी ते 7वी
1)कु.प्रेम योगेश पंडित प्रथम क्रमांक
2)कु.श्रुतिका हणमंत पाटील द्वितीय क्रमांक
3)कु.तन्मय सिद्धेश्वर तेली तृतीय क्रमांक
काव्य गायन स्पर्धा 8वी ते 10वी
1) कु.बिस्मिल्ला महमद अष्टेकर प्रथम क्रमांक
2) कु.अन्वी अविनाश चौंडाज द्वितीय क्रमांक
निबंध स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी
1) कु.अनिरुद्ध सुनील खोत प्रथम क्रमांक
2) कु.श्रुतीका हनुमंत पाटील द्वितीय क्रमांक
3) कु.सक्षम राहुल कनवाडे तृतीय क्रमांक
निबंध स्पर्धा इयत्ता 8वी ते 10वी
1) कु.प्रतीक प्रकाश घुटुगडे.प्रथम क्रमांक
2) कुमारी प्रणोती राजेंद्र सिंग राजपूत .द्वितीय क्रमांक
3) प्रज्वल दत्तात्रय सूर्यवंशी.तृतीय क्रमांक
देखो और लिखो प्रतियोगिता इयत्ता 5वी ते 7वी
1) क. शिवरत्न संदीप अजेटराव प्रथम क्रमांक
2) कु.आदिती स्वप्निल खोत द्वितीय क्रमांक
3) कु.आर्या श्रीकांत परीट तृतीय क्रमांक
अनुलेखन स्पर्धा इयत्ता 3 री ते 4थी
1) कु.हर्षदा प्रशांत पाटील प्रथम क्रमांक
2) कु.श्लोक संतोष सुतार द्वितीय क्रमांक
3) कु.संस्कृती संदीप भोसले तृतीय क्रमांक
पहा आणि ओळखा (अभ्यास विभाग) नर्सरी ते मोठा गट
1) कु. तन्वी राजेश दुधाळे प्रथम क्रमांक
2) कु. सई उत्तमराव जाधव द्वितीय क्रमांक
3) विस्मइ महेश देसाई तृतीय क्रमांक
पोस्टर प्रदर्शन आणि घोषवाक्य स्पर्धा
1) कु.मुश्ताक बेपारी .प्रथम क्रमांक
2) क. अनिरुद्ध खोत. द्वितीय क्रमांक
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनींनी रसिका कोरवी व प्रणोती राजपूत यांनी केले यासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री.अधिकराव पवार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ .वंदना कुंभार हिंदी विभाग प्रमुख सौ.विनिता रावळ हिंदी विषयाच्या शिक्षका सौ.अर्चना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.