Friday, September 20, 2024
Homeखेळजिला स्तरीय बैडमिंटन स्पर्धामध्ये काटोल चा संघ उपविजेता...

जिला स्तरीय बैडमिंटन स्पर्धामध्ये काटोल चा संघ उपविजेता…

नरखेड – जिला क्रीड़ा संकुल मानकापुर येथे झालेल्या जिला स्तरीय बैडमिंटन स्पर्धामध्ये माउंट कार्मेल कान्वेंट चा बैडमिंटन संघ जिल्हा मधे उपविजेता झालेला आहे.माउंट कार्मेल कान्वेंट च्या विद्यार्थिनी कु. गार्गी मदन ढोले कु.आर्या जीचकार कु. हिरल वासाडे कु. स्वरा गिरी या विद्यार्थीनी अंडर-17 मूलीचा स्पर्धामध्ये सुंदर प्रदर्शन करित उपविजेता ठरलेल्या आहे या अनुषंगाने काटोल बैडमिंटन अकॅडमी मध्ये त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी काटोल चे आदरणीय क्रीड़ा शिक्षक श्री अनिलजी धान्डे सर यांची उपस्थिति होती. प्रमुख अतिथि म्हणुन नागपुर येथील प्रसिद्ध बैडमिंटन खेलाडू आणि प्रशिक्षक जयेंन्द्र ढोले,काटोल चे न्यायाधीश श्री पद्माकर जोन्धले साहेब, श्री अशोकजी राउत सर यांनी उपस्थिति दर्शविली.

या प्रसंगी श्री जयेंद्र ढोले सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन स्वप्निल मेश्राम व प्रतीक मेश्राम,प्रशिक्षक बैडमिंटन अकॅडमी काटोल यांनी केले होते. माऊंट कारमेल कॉन्व्हेन्ट च्या प्राचार्या आणि शिक्षकानी विद्यार्थिनी चे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: