काटोलच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातून घडतील अधिकारी-अनिलबाबू देशमुख
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राला भेट व आढावा
नरखेड – अतुल दंढारे
काटोल जि.प.स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राला मानव विकास कार्यक्रमातून अडीच कोटी रुपये मंजूर करून दिला आहे.त्यामुळे अत्याधुनिक व सर्व सोयीयुक्त स्पर्धा परीक्षेची निर्मिती होऊ शकली आहे.हे अभ्यास केंद्र विदर्भात सर्वात्तम असल्याची प्रतिक्रिया माजी गृहमंत्री तथा आमदार अनिलबाबू देशमुख यांनी व्यक्त केली.
जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोलला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला.यावेळी पं.स.सभापती संजय डांगोरे, माजी जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे, माजी उपसभापती अनुप खराडे, तारेश्वर शेळके,अमित काकडे, संदीप ठाकरे, आयुब पठाण प्रामुख्याने उपस्थित होते.विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतांना स्पर्धा परिक्षेबाबत चर्चा केली.
पुन्हा विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा हव्यात याबाबत आस्थेने विचारपूस केली.अभ्यास केंद्राचे व्यवस्थापन व संचलन बघून अनिलबाबू देशमुख यांनी कौतुक केले.काटोल-नरखेड भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्राचा लाभ घ्यावा व अधिकारी बनून देशाची सेवा करावी असा आशावाद व्यक्त केला. यावेळी अनिलबाबू देशमुख यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया व केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे यांनी केला.