- कार प्रकल्प अजूनही रखडलेला.
- रणजित देशमुख यांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक.
- प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांशी केली चर्चा.
- विकास कामांचा घेतला आढावा.
- कार्यकर्त्यांनी केली खंत व्यक्त .
- काटोल विधान सभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा घेणार मेळावा.
नरखेड – अतुल दंढारे
महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री रणजित देशमुख यांनी जलालखेडा येथे जिल्हा परिषद सर्कल मधील कार्यकर्त्याची बैठक घेतली. प्रतेक गावातील प्रमुख कार्यकर्त्याला रविवारी जलालखेडा येथे झालेल्या बैठकीला बोलावण्यात आले होते. यावेळी रणजित देशमुख यांनी कार्यकर्त्यांकडून विकास कामांचा आढावा घेत समस्या विषयी जाणून घेतले.
प्रत्येक कार्यकर्त्यांनी गावातील समस्या विषयी व विकास कामे पूर्णपणे थांबली असल्याचे सांगितले.त्याच प्रमाणे शासकीय कार्यालयात कामानिमित्त गेले असता काम होत नसून अधिकारी ऐकत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राला कोणीही वाली नसल्यामुळे विकास कामे होत नाही. विकास कामे रखडलेली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
या क्षेत्राला चांगल्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मागील आमदार यांनी मोठा प्रमाणात जलयुक्त शिवार, पांधन रस्ते अशी अनेक विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली होती. या क्षेत्राचे आमदार तुरुंगात असल्यामुळे या भागाचा विकास झाला नसून. या भागात सिंचन, बेरोजगारी, अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून यावर कोणाचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. अधिकारी कसलीही कार्यवाही करत नाही.
त्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक राहलेला नाही. डॉ आशिष देशमुख आमदार असताना या क्षेत्रातील पूरपिढीत गावांसाठी 10 कोटीचा निधी मंजूर करून मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली होती. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्या नंतर या क्षेत्राचा विकास थांबला असून अधिकाऱ्यांवर कोणाचा वचक राहलेला नाही. अधिकाऱ्याकडे कामा निमित्त गेलो असता ते काम करून देत नाही अशी खंत कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच या भागातील कार प्रकल्प अजून पर्यंत पूर्ण झाला नसून आहेच त्या स्थितीत आज दिसतो. शेतकऱ्यांचा सिंचन प्रश्न अजून पर्यंत मिटलेले नाही. त्याच प्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या शेती लिलाव करायला निघाले असून ज्यांनी या बँक बुडवल्या ते मोकाट फिरत आहे. आणि शासन शेतकऱ्यांच्या जमिनी लिलाव करत आहे. यावेळी बोलताना रणजित देशमुख म्हणाले की काटोल विधानसभा क्षेत्र आता कलंकित झाले असून विधानसभा शेत्राचे नाव खराब झाले आहे.
विकास कामे मोठ्या प्रमाणात थांबली आहेत हे सत्य आहे. काटोल विधानसभातील नागरिकांचा सर्वांगीन विकास होणे आवश्यक आहे. बेरोजगारी येथील युवकांचा मोठा प्रश्न असून सिंचनाच्या बाबतीत कोणत्याच प्रकारचा प्रकल्प नाही ज्याचा शेतकरयांना फायदा होत असेल. अधिकाऱ्यांना घाबरण्याची कसलीही गरज नाही. त्यांच्या कडून काम करून घेणे आपली जबाबदारी आहे. अधिकारी कीवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे हा त्यावरचा मार्ग नसून त्यांचा कडून व्यवस्थित रित्या काम करून घेणे आपली जबाबदारी आहे.
तसेच येत्या काही दिवसात आपण स्वतः या विधान सभा क्षेत्रातील आठ जिल्हा परिषद सर्कल व तीन नगरपरिषद भागातील सर्व कार्यकर्त्यांचा भेटी गाठी घेऊन लवकरच काटोल येथे विधानसभेतील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे रणजित देशमुख यांनी सांगितले. यावेळी कुलदीप हिवरकर, अनिल चौधरी , प्रमोद पेठे , प्रभाकर जाणे, शरद जुडपे, मोहन मातकर, राजेंद्र पोतदार,नंदू चरपे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.