Sunday, December 22, 2024
HomeBreaking Newsकाटोल | वाघोबा देवस्थान शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू...

काटोल | वाघोबा देवस्थान शिवारात विज पडुन दोघांचा मृत्यू…

काटोल : आज दि.12/05/2024 रोज रविवार ला मौजा आलागोंदी ता.काटोल येथील शिवारात विज पडुन दोघे जण मृत्युमुखी पडले…श्री उत्तमराव पंचभाई, मु, उदापुर ता.वरुड यांचेतर्फे मौजा आलागोंदी येथे वाघोबा देवस्थान मध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला विविध ठिकाणांहून अंदाजे 50 लोकं उपस्थित होते, अचानक दुपारी 2.30 वाजताचे सुमारास विजेच्या कडकडासह वादळी पाऊसाला सुरुवात झाली पावसामुळे भागवत दौलत भोंडवे,वय 55 वर्षे रा.उतखेड ता.वरुड जि.अमरावती व जयदेव नभु मनोटे,वय 60 वर्षे ,रा.कला मगोना ता.जि.बैतुल पळसाच्या झाडाखाली बसले असता अचानक विज पडुन दोघेही मृत्युमुखी पडले,

सदर घटनेची माहीती मिळताच नागपुर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच तहसीलदार काटोल, पोलीस उपनिरीक्षक कोंढाळी श्री त्रिपाठी साहेब यांना माहीती दिली.त्यानुसार त्यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच धवल देशमुख पोलीस.उ.नि.कोंढाळी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी शव काटोल येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले, शवविच्छेदन करण्यासंबंधी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.दिनेश डवरे यांना चंद्रशेखर चिखले यांनी सुुचित केले.

घटनास्थळी बंडुभाऊ राठोड, आलागोंदी पोलीस पाटील सौ.उषा घोरमाडे,वाई पोलीस पाटील, राजु कराळे, सरपंच अशोक तागडे, प्रमोद घोरमाडे,संजय डफर , संजय मानकर, श्रीकृष्ण मानकर, राजु पंचभाई, बाबा सहारे, मनोहर हेलोंडे, पुरुषोत्तम कोहळे, विलास नेहारे, होमेश्वर धोतरकर तसेच कोतवाल योगेश्वर वैद्य यांनी सहकार्य केले, मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: