Kasganj : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी आरडाओरडा झाला. गावकरी आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. ट्रॉलीतून 40 जण प्रवास करत होते, 4 मुलांची प्रकृती गंभीर.
मिळालेल्या माहितीनुसार, माघ महिन्यात स्नानासाठी जात असताना शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कासगंजमधील पटियाली दरियावगंज रस्त्यावर एक अनियंत्रित ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडली. ट्रॉलीमध्ये प्रवास करणाऱ्या सात मुले आणि आठ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला.
#UP के जिला कासगंज में बड़ा हादसा –
— Surabhi Tiwari🇮🇳 (@surabhi_tiwari_) February 24, 2024
तालाब में पलटी ट्रैक्टर-ट्रॉली। करीब 15 लोगों की मौत हुई। ये सभी लोग आज गंगा स्नान के लिए जा रहे थे। तालाब से अस्पताल तक लाशों का ढेर लगा। #Kasganj #कासगंज pic.twitter.com/wy9WGkspfw
आसपासचे गावकरी आणि पोलीस मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. तलावातून सुटका करण्यात आलेल्या भाविकांना पतियाळी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे भाविक एटा जिल्ह्यातील काहा गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीएमओ राजीव अग्रवाल यांनी सांगितले की, अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सात निष्पाप मुलांचा समावेश आहे, तर आठ महिलांचा समावेश आहे.
15 dead after tractor-trolley falls in pond in UP's Kasganjhttps://t.co/auEIkKQa8M pic.twitter.com/uhIpFs0q8h
— Hindustan Times (@htTweets) February 24, 2024