Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayभाजपचा बालेकिल्ला कसबा आता महाविकास आघाडीच्या ताब्यात...रवींद्र धंगेकरांचा विजय!...

भाजपचा बालेकिल्ला कसबा आता महाविकास आघाडीच्या ताब्यात…रवींद्र धंगेकरांचा विजय!…

पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा काय निकाल लागणार? यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते, आज कसबा पोटनिवडणुकीसाठी संपूर्ण मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे.

गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांच्या रुपाने महाविकास आघाडीला भाजपावर मोठा विजय मिळाल्याने पुण्यात जल्लोष सुरु झाला आहे. राजकीय जाणकारांनी आधीच धंगेकर विजयी होतील असा अंदाज लावला होता, तो तंतोतंत खरा ठरला आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ०४० मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.

कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती. खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपाकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपाविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: