पालघर – दिनांक २१/०७/२०२३ रोजी फिर्यादी महेश मरल्या रायात वय ३६ वर्षे, रा. उपलाट, शनवारपाडा, ता. तलासरी, जि. पालघर यांनी फिर्याद दिली की, फिर्यादी यांचेसोबत आरोपी प्रविण मधुकर वड वय २९ वर्षे रा. उटावली चौधरी पाडा ता. विक्रमगड जि. पालघर याने तोंडओळख करुन फिर्यादीस तो पोलीस असल्याची बतावणी करुन काही मदत लागली तर सांग असा विश्वास संपादन करुन त्याचे मुंबई येथील मित्र हे ५००/- रुपये नोटांचे बदल्यात १००/- रुपयांच्या नोटा घेतात व जेवढी ५०० /- रुपये नोटांची रककम देईल त्याची दुप्पट रक्कम १००/- रुपयाचे नोटांत देण्यात येईल असे सांगुन दिनांक २०/०७/२०२३ रोजी १६.०० वाजण्याचे सुमारास चारोटी ब्रिज पुढे मुंबई वाहिनीलगत फिर्यादीस घेवून जावून त्याचे इतर ३ अनोळखी साथीदारांचे मदतीने १,००,०००/- रुपये रोख रक्कम घेऊन फसवणुक करुन युनिकॉन मोटार सायकल क्रमांक एम.एच.४८- बी.क्यु.- ०६३१ वर बसुन मुंबईच्या दिशेने पळून गेले म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन कासा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ११८ / २०२३ भा.द.वि.स. कलम ४२०, १७०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी
श्री. शैलेश काळे, उप विभागिय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नामदेवबंडगर, पोलीस निरीक्षक, कासा पोलीस ठाणे यांना कारवाईबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे श्री. नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक, कासा पोलीस ठाणे यांनी पोलीस पथक तयार करून गुप्त बातमीद्वारे तसेच तांत्रीक माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील मुख्य आरोपीत प्रविण मधुकर वड रा. उटावली, चौधरीपाडा, ता. विक्रमगड, जि. पालघर याचा शोध घेऊन विशेष प्रयत्न करुन ताब्यात घेण्यात आले.
त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याचे इतर ३ साथीदार १) पप्पु बबन कडव वय ३५ वर्षे, रा. सावनी, ता. वाडा, २) नितेश कृष्णा भोईर वय ३२ वर्षे, रा. सावनी खुर्द, ता. वाडा ३) नितीन पदु धनवा वय ३० वर्षे रा. वरला, ता. वाडा जि. पालघर हे आरोपी निष्पन्न करुन गुन्ह्यातील फसवणुक केलेली रोख रक्कम १,००,०००/- रुपये व गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकलसह आरोपीत यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास हा पोउपनि / बी. ए. गायकवाड नेमणूक कासा पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कारवाई श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शैलेश काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग, श्री. नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक,
कासा पोलीस ठाणे, पोउपनि / बी. ए. गायकवाड, पोउपनि / संदिप नागरे, पोउपनि / यु.एस. सोळंके, पोहवा / ७९८ रंजित वसावला, पोहवा / ६२९ संदिप चव्हाण, पोशि/ ११५७ भरत शिंदे, पोशि/ ११५४ विकास शिरसाट, पोशि/ ११५५ शशिकांत चव्हाण, पोना/२४५ मुकेश लोहार सर्व नेमणूक कासा पोलीस ठाणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.