Monday, December 23, 2024
Homeविविधकरवीर | शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याबद्दल...

करवीर | शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याबद्दल आनंद उत्सव…राजू यादव

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले

करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगाव कमानीजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला तसेच शिवसैनिकांनी मा. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेनेच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपतालुकाप्रमुख दिपक पाटील, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, फेरीवाला संघटनेचे कैलास जाधव व बाळासाहेब नलवडे, हिंदुत्ववादी शरद माळी, योगेश लोहार, शिवपुत्र स्वामी, किशोर नाकट, सुरेश शिलेदार, सूरज पाटील, इमाम पठाण, शफीक देवळे, अजय प्रभावळे, उल्फत मुल्ला आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: