Karni Sena : करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची मंगळवारी जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी भरदिवसा स्कूटरवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर त्यांना तातडीने मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटना घडल्यानंतर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोगामेडी हे दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास श्यामनगर येथील त्यांच्या घराबाहेर उभे होते. त्यानंतर स्कूटरवरून आलेल्या काही लोकांनी तेथे पोहोचून गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या गोगामेडी यांच्यासोबत अजित सिंह देखील होते.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या घटनेत सहभागी झालेल्या गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राजस्थानचे पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी या घटनेबाबत सांगितले की, प्राथमिक वृत्तानुसार, गोगामेडी उपस्थित असलेल्या एका घरात चार जण घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. या घटनेत गोगामेडीचा एक सुरक्षा कर्मचारी आणि अन्य एकजण जखमी झाला.
#WATCH | Rajasthan | Sukhdev Singh Gogamedi, national president of Rashtriya Rajput Karni Sena, shot dead by unidentified bike-borne criminals in Jaipur. He was declared dead by doctors at the hospital where he was rushed to. Details awaited. pic.twitter.com/wGPU53SG2h
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) December 5, 2023