रामटेक – राजू कापसे
आज दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी नंदीवर्धन कनिष्ठ महाविद्यालय, नगरधन येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेकच्या वतीने समान संधी केंद्र बाबत माहिती व युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रामटेक तालुक्यातील समतादूत राजेश राठोड यांनी विद्यार्थ्यांना समान संधी केंद्र बाबत माहिती व शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ‘मासोळी’ या गेय कवितेचे सादरीकरण केले.मौदा तालुका समतादूत ओमप्रकाश डोले यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणाला प्राधान्य द्यावे अन्य बाबींवर लक्ष केंद्रीत करू नये असा सल्ला दिला.
युवकांच्या अनेक समस्या आहेत परंतु त्या समस्या सोडविण्यासाठी कोणताही उपक्रम या पुर्वी उपलब्ध नव्हता मात्र समान संधी केंद्र या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्या वर आधारित चर्चा सत्र व उपाय योजना तसेच तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन मिळविणे, शिष्यवृत्ती प्रक्रियेबाबत माहिती मिळविणे, रोजगार व व्यवसाय तसेच उद्योजक विकास बाबत माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकणार आहे.
याकरिता नोडल अधिकारी म्हणून अमन होलगीरे व अमृता कडूकर यांची निवड करण्यात आली असून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून करण लिल्हारे, समिक्षा उपराडे ,सेजल खंडाइत याची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख अमन होलगीरे होते.
उपक्रमास प्राचार्य दिपक मोहोड यांचे अनमोल सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक संजय बिरणवार यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक सोमेश्वर दमाहे यांनी केले.या प्रसंगी निलेश बंधाटे,शेंडे,मिनाज पौचातोड,सारीका माहूरकर,वैभव बावनकुळे,राम बावणकुळे, प्राजक्ता कामडी,रोहिणी ठाकरे इत्यादी प्राध्यापक मंडळी व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.