Saturday, November 23, 2024
Homeराज्यकारला शाळेला साहित्य भेट...

कारला शाळेला साहित्य भेट…

नरखेड – अतुल दंढारे

‘वेक्टर ग्रिन सोलर एनर्जी प्राय. लिमिटेड ‘ आणि ‘ आसरा सामाजिक लोक कल्याण समिती , देवास (म.प्र.) यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.प्राथमिक शाळा, कारला येथे विद्यार्थ्यांसाठी नऊ डेक्स बेंच, कपाट व पाण्याची टाकी (एक हजार लि.) या साहित्याचे वितरण ‘व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधी’ (CSR) मधून करण्यात आले.

या कार्यक्रमाला कंपनीचे व्यवस्थापक सुहास वाकोडीकर ,राहुल बढिये,सरपंच सौ.शोभाताई मोरोलिया, उपसरपंच उमेश बेहनिया , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरीष मोरोलिया, आसरा समितीच्या वतीने कार्यक्रम समन्वयक विकास जाट ,उमेश देशमुख,मुख्याध्यापक संजय ताथोडे,शिक्षिका वनिता गोरे, अमित मोरोलिया ,जगदिश मोरोलिया व शा.व्य.समितीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका वनिता गोरे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजय ताथोडे यांनी मानले.यावेळी शाळेच्या वतीने आसरा फाऊंडेशन व सोलर कंपनीचे आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: