वाशिम : कारंजा पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदाराला दहा हजाराची लाच मागणी प्रकरणी वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. संदीप रुस्तम जाधव, वय 40 वर्ष, असे पोलीस हवालदाराचे नाव व ब. नं. 898 असून त्यावर कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तक्रारदार यांचे विरुद्ध चिडीमारी ची केस असल्याची बतावणी करून ती निकाली काढण्यासाठी आलोसे श्री संदीप रुस्तम जाध व यांनी तक्रारदार यांचेकडे 10,000 /-रु ची मागणी करुन पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे यांनी तडजोडीअंती 8,000/- रू. स्विकारण्यास तयारी दर्शवली वरून दि.26/04/2023 रोजी प्रत्यक्ष सापळा कारवाई तक्रारदार यांचे दुकानाचे परिसरात आयोजित केली असता आलोसे यांना तक्रारदार यांच्यावर संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. तक्रारदार यांचे फिर्याद वरून पोलीस स्टेशन कारंजा शहर, जि.वाशिम येथे गुन्हा नोंदविला आहे.
सक्षम अधिकारी
मा. पोलीस अधीक्षक सा. वाशिम.
सापळा व तपास अधिकारी
श्री. सुजित कांबळे
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
9922243438
पर्यवेक्षण अधिकारी
श्री.गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक
ला.प्र.वि. वाशिम.
सापळा कार्यवाही पथकश्री. सुजित कांबळे, पोहवा राहुल व्यवहारे, आसिफ शेख , पोलीस नाईक समाधान मोघाड, रवी घरत,चापोशी शेख नावेद
मार्गदर्शन –
१) मा. श्री. मारुती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा.श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक,
3) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.