चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
महाविकास आघाडीच्या विधानसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध विचारवंत तथा डिबेटर कान्हया कुमार यांचा चंद्रपूर जिल्ह्यात नियोजित दौरा असल्याने वातावरण तापण्याची चिन्हे वर्तवली जात आहे. बल्लारपूर आणी ब्रम्हपुरोत नियोजित सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळो 11 वाजता बल्लारपूर येथील गांधी चौकात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.बल्लारपूर शहरातील वस्ती विभागात बिहार आणी उत्तरप्रदेश येथील मतदारांची संख्या अधिक असल्याने त्यांना आकृष्ठ करण्यासाठी कन्हया कुमार यांची सभा होत आहे.
या आयोजित सभेसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यात विशेषतः युवा कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.बल्लारपूरच्या सभे नंतर ब्रम्हपुरीतही कन्हया यांची सभा आहे.
दरम्यान युवा नेता म्हणून युवकांचे आयकॉन असलेले, आपल्या भाषणातून लोकांना विचार करायला प्रवृत्त करायला लावण्याची ताकद कन्हया कुमार त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषण शैलीत असल्याने ते या सभेत काय बोलतील याकडे मतदार तथा बुद्धिजीवींचे लक्ष लागले आहे.