रामटेक – राजू कापसे
ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या नागपूर ग्रामीण अध्यक्ष. सौ कांचनमाला मोरेश्वर माकडे यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद नागपूर येथे अशासकीय सदस्य म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर तर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी तीन वर्षाकरिता नियुक्ती केलेली आहे.
ग्राहकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणार व अनुचित व्यापार व फसगत याविषयी त्रस्त ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य मी करेल अशी ग्वाही यावेळी सौ. कांचनमाला माकडे यांनी यावेळी दिली.ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या नियुक्त झालेल्या सर्व सदस्याकडूनही सौ. माकडे यांचेकडुन अशीच अपेक्षा केलेली आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर विजय लाड, राज्य सचिव अरुणजी वाघमारे , राज्य सहसंघटक मेधा कुलकर्णी , विदर्भ प्रांत अध्यक्ष श्री शामकांत पात्रीकर सर , विदर्भ सचिव श्री लीलाधर लोहरे सर , विदर्भ संघटक डॉक्टर कल्पना उपाध्याय मॅडम यांनी सौ कांचनमाला माकडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा पदान केलेल्या आहे.
ग्राहक पंचायत रामटेक तालुका कार्यकारणीच्या वतीने .सौ कांचनमाला मोरेश्वर माकडे यांचा शाल, पुष्पगुच्छ व वृक्षरोपटे देऊन सत्कार करण्यात आला .या प्रसंगी रामटेक तालुका अध्यक्ष श्री मोरेश्वर दामोदर माकडे , तालुका सचिव श्री श्रीधर पुंड , तालुका संघटक श्री अनिल मिरासे , सदस्य श्री मनोहर बावनकर सर , श्री महेश सुरसे , श्री सुनील सावरकर , श्री महाजन, सौ माधुरी सावरकर व इतर अन्य सदस्य उपस्थित होते.