मौदा (ताप्र) – राजू कापसे
शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर मार्फत आयोजित शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ भव्य सोहळा कवी सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला. या याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोक्कडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुनील बाबू केदार, खासदार श्याम कुमार बर्वे, आमदार सुधाकर आडबले,
उपाध्यक्षा कुंदा राऊत, सभापती राजकुमार कुसुंबे, अवंतिका लेकुरवाळे, प्रवीण जोध, मिलिंद सुटे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, शिक्षणाधिकारी माध्यमिक रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी प्राथमिक सिद्धेश्वर काळुसे उपस्थित होते.
याप्रसंगी मौदा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराडा पुनर्वसन येथील विषय शिक्षक कमलाकर हरिभाऊ ठोसरे यांना पाहुण्यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले. मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धेत या शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला होता.
कमलाकर ठोसरे यांनी या शाळेत अनेक उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला. याप्रसंगी पं.स. सभापती स्वप्नील श्रावणकर, गटशिक्षणाधिकारी किरण चीनकुरे, शिक्षण विस्तार अधिकारी आशा गणवीर, निर्मला मस्कर, रामेश्वर भक्तावरती, केंद्रप्रमुख जुगल किशोर बोरकर, शिल्पा सूर्यवंशी,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश कुलूरकर, उपाध्यक्षा दर्शना खोब्रागडे, सदस्य मिलिंद डोंगरे, अश्विनी कुलूरकर, निषेध शेंद्रे, स्वाती ठोसरे, विषय शिक्षक हेमराज वैद्य, मंगेश कांबळे, स्मृती हिरेखन, चंदा भजने व पालक वर्ग उपस्थित होते.