Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनसत्यशोधक । लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांनी बघितला अविस्मरणीय सत्यशोधक सिनेमा...

सत्यशोधक । लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांनी बघितला अविस्मरणीय सत्यशोधक सिनेमा…

अमरावती – सत्यशोधक सिनेमा बघण्यासाठी लेडी गव्हर्नर कमलताई गवई हे राजलक्ष्मी थिएटर मध्ये आले असता त्यांनी सत्यशोधक पिक्चरची भरभरून स्तुती केली व बोलताना म्हणाल्या की माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय चित्रपट म्हणजे सत्यशोधक आहे.

याप्रसंगी सत्यशोधक टीम मधील बबलू डोके तृप्ती मेश्राम प्रशांत गवळी इतरही मान्यवर होते तसेच थेटर चे मॅनेजर पांडेजी सुद्धा उपस्थित होते वीस एकवीस दिवस उलटल्यानंतरही पिक्चर बघण्यासाठी तुडुंब गर्दी होती हा पिक्चर समाज हिताचा तसेच संघर्षमय जीवनातून आलेला आहे.

या पिक्चर मधून बराचसा बोध मिळतो असे उद्गार सुद्धा कमलताई गवई यांनी काढले हा पिक्चर प्रत्येक महिलांनी व शाळकरी मुलांनी पाहणे ही गरज आहे कारण संघर्षाची सुरुवात शालेय जीवनापासूनच सुरुवात होते अशाही त्या म्हणाल्या त्यांनी तक्षशिला शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी सिनेमा पाहण्याचे आयोजन सुधा केले सर्व महिला विद्यार्थी नागरिक यांनी हा सिनेमा पाहावा असे आवाहन पण केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: