Kalpana Soren : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज अंमलबजावणी संचालनालयासमोर चौकशीसाठी हजर होणार आहेत. सोमवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीच्या छाप्यानंतर ‘बेपत्ता’ झालेले सोरेन तब्बल ४० तासांनंतर मंगळवारी रांचीत पोहोचले आणि त्यांनी आपल्या आमदारांची भेट घेतली. झारखंडच्या राजकारणातील सर्व नाट्यादरम्यान, भाजप नेते निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे की हेमंत सोरेन यांना अटक झाल्यास त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री म्हणून बसवू शकतात.
उल्लेखनीय आहे की याआधीही ईडीच्या समन्स दरम्यान हेमंत सोरेन यांनी कल्पना यांना झारखंडमध्ये मुख्यमंत्रीपद देण्याची चर्चा असलेल्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. तेव्हाही हेमंत सोरेन बिहारमध्ये लालू यादवांचा मार्ग अवलंबून आपल्या पत्नीला राबडीदेवींप्रमाणे मुख्यमंत्री बनवू शकतात, असा अंदाज भाजपने बांधला होता. 1996 मध्ये बिहारमध्ये अटक झाल्यानंतर लालूंनी मुख्यमंत्रिपद पत्नी राबडी देवी यांच्याकडे सोपवले.
#WATCH | Delhi | Amid ED probe against Jharkhand CM Hemant Soren, BJP MP Nishikant Dubey says, "I had complained to the Lokpal and CBI had conducted its preliminary enquiry. You would be surprised to know that there are 82 properties – that belong to Shibu Soren, his wife, Hemant… pic.twitter.com/h1LTql4MKB
— ANI (@ANI) January 30, 2024