Monday, December 23, 2024
Homeराजकीयलोकसभा निवडणूकीच्या मत मोजणीसाठी कळमना बाजार समिती सज्ज...

लोकसभा निवडणूकीच्या मत मोजणीसाठी कळमना बाजार समिती सज्ज…

जिल्हाअधिकारी यांनी प्रत्यक्षपणे केली पाहणी…

रामटेक – राजु कापसे

नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जुन ला कळमना बाजार समिती नागपूर परिसरात असुन कळमना बाजार समिती मत मोजणीकरीता सज्ज झालैले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे चांगला वंदोबस्त करण्यात आला आहे. कळमना बाजार समिती मधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही त्रास नव्हता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

४ जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बेलॅटची मतमोजणी होणार आहे. ५०० बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे १० टेबल १० अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी नागपूर लोकसभेसाठी १२० टेबल व रामटेकसाठी १२० टेबल या प्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे.

राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी यादृष्टीनेही नियोजन केले आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: