दिनांक 28/09/2023 रोजी हरिहर पेठ,रमाबाई नगर, अकोला येथे मेरी माटी मेरा देश अंतर्गत अमृत कलश रॅली यात्रा काढण्यात आली, या कार्यक्रमाला प्रामुख्याने मंडळ सदस्य नितुताई लोखंडे, सुशीला धनवाडे, कविता शिरसाट, शितल भूतळा, प्रीती मोरे,शाहीन शेख,कविता गायकवाड, छाया तायडे, निकिता शिरसाट, सानिया शेख, सोनल धनवाडे, उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम घरोघरी जाऊन माटी कलश मध्ये एकत्र करण्यात आली व त्यानंतर मेरी माटी मेरा देश चे महत्व सर्वांना समजून सांगण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वीरिते पार पाडण्यासाठी अकोला तालुका स्वयंसेवक राधा खंडारे यांनी परिश्रम घेतले.