सांगली – ज्योती मोरे
सांगलीत सध्या सुरू असलेल्या श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने आज सकाळी दहा वाजता राम मंदिर पासून कलर शोभायात्रेचा आयोजन करण्यात आले. सदर शोभायात्रेत हत्ती, घोडे उंट खास आकर्षण ठरले, तर लेझीम, धनगरी ढोल, ढोल पथकांसह वारकऱ्यांनी सारी सांगली नगरी भक्तीमय करून केली. सदर शोभायात्रेत प.पू. भरत दासाचार्यजी महाराज, ह.भ. प. प. समाधान महाराज शर्मा, सांगलीकर बंधू भगिनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
राममंदिर पासून सुरु झालेली ही शोभायात्रा पुष्पराज चौक,मार्केट यार्ड,गेस्ट हाऊस,धामणी रोड मार्गे कल्पद्रुम ग्राउंड वरील आयोध्या नगरीत आली.यानंतर श्री राम कथेचा शुभारंभ परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा, यजमान हिडदुगी परिवारातील सदस्यांसह सांगलीसह जिल्ह्यातील हजारो भक्तगण उपस्थित होते. या कार्यक्रमाला सांगलीकरांसह जिल्ह्यातील भक्त मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळत असून सर्व जाती धर्मातील लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.