सांगली – ज्योती मोरे
नव कृष्णा व्हॅली स्कूल विजयनगर म्हैसाळ स्टेशन मध्ये सुरजमलजी लुंकड यांची पुण्यतिथी साजरी करणेत आली. प्रतिमेचे पूजन मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री सुनिल चौगुले व इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक श्री. अस्लम सनदी सर यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेमध्ये पुण्यतिथी निमित्त इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांची दोन गटात हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली . विजयनगर मधील कै.सुरजमलजी लुंकड ग्रंथालय / वाचनालयास भेट देवून गोष्टीची पुस्तके वाचनास देण्यात आली . स्व.सुरजमलजी लुंकड यांच्या प्रतिमेचे पूजन प. पू बजरंग झेंडे महाराज यांनी केले.
त्यांच्या हस्ते सर्व मुलांना बिस्कीट वाटप करणेत आले. सर्व विध्यार्थ्यानी गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करण्याचा आनंद घेतला. “वाचाल तर वाचाल” या विचारा प्रमाणे मुलांना वाचनाचे महत्व समजाऊन देण्यात आले.
सकाळी ११ वाजता मिरज येथील पाठक अनाथाश्रम व वृद्धाश्रम या ठिकाणी इयत्ता 3 री व 4 थी च्या विध्यार्थ्यांना घेऊन भेट देण्यात आली. कै . सुरजमलजी लुंकड यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेकडून त्यांना दैनदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, पौस्टिक खाऊ फळे भेट देण्यात आले.
शालेय विध्यार्थी व शिक्षक स्टाफ यांनी स्वतः आपल्या तर्फे रुमाल, बिस्किटे, फळे, टूथ ब्रश, साबण, तेल, शाम्पू, चॉकलेट इ.असे अनेक वस्तू भेट म्हणून दिले. शालेय जीवना पासूनच विध्यार्थ्यांना सामाजिक कार्याची जाणीव व जबाबदारी विषयी माहिती व अनाथ मुले वा व्रद्धा बद्दलची आपुलकी निर्माण व्हावी व एक सुजाण नागरिक व्हावे या हेतूने सदरची भेट आयोजित करणेत आली होती.
हस्ताक्षर स्पर्धेत मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नंबर आलेत त्यांना पेन पेन्सिल बॉक्स देण्यात आले . कुपवाड या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच याच्यासाठी “असा घडला आदर्श गाव “ या विषयी आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त श्री भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सुरज फौंडेशन चे संस्थापक ट्रस्टी चेअरमन मा. श्री. प्रवीणजी लुंकड सर, प. पू. बजरंग झेंडे महाराज, सचिव एन.जी. कामत सर, संचालिका सौ .संगीता पागणीस मॅडम , कुपवाड मराठी मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार सर , प्रशासकीय विभाग प्रमुख श्री रघुनाथ सातपुते सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख धनश्री जोशी व बबिता कांबळे, मुख्याध्यापक सुनिल चौगुले व अस्लम सनदी , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.