Friday, November 22, 2024
Homeराज्यकृ.उ.बा. समितीचा 'संचालक मंडळ यशस्वी वर्षपूर्ती व पशुपालक मार्गदर्शन मेळावा' संपन्न...

कृ.उ.बा. समितीचा ‘संचालक मंडळ यशस्वी वर्षपूर्ती व पशुपालक मार्गदर्शन मेळावा’ संपन्न…

रामटेक – राजु कापसे

कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक ला ५० वर्ष पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने सुवर्ण महोत्सव दिनी आज दि. २३ जुन रोज रविवार ला शहरातील गंगाभवनम सभागृहात ‘संचालक मंडळ यशस्वी वर्षपुर्ती व पशुपालक मार्गदर्शन मेळाव्याचे ‘ आयोजन करण्यात आले होते.

यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हजर असलेले माजी राज्यमंत्री सुनील केदार यांनी वर्षभरातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न दुप्पट केल्याबाबद सभापती सचिन किरपान यांचेवर कौतुकांचा वर्षाव केला व आपल्या राजकिय कारकिर्दीबाबद सांगतांना ‘ प्रेम, विश्वास आणि आपुलकी हेच आपल्या राजकारणाचे गणित ‘ असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात २३ जुन ला दुपारी १ च्या सुमारास झाली. प्रारंभी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांकडून उपस्थित कास्तकारांना पशुधनावर मोलाचे मार्गदर्शन झाले. यानंतर स्मरणीका पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यानंतर आजी माजी सभापती, उपसभापती यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री सुनील केदार यांचेसह नागपुर जिल्हा काँग्रेस कमेटी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी खासदार प्रकाश जाधव, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, देवेंद्र गोडबोले, नरेश बर्वे, अमरजीत खानापुरे, अनिल रॉय, मिन्नु गुप्ता, बमनोटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सुनील केदार यांना विठ्ठलाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यानंतर लगेच भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दरम्यान पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वर्षभऱ्यातच दुपटीने वाढविल्याबद्दल सभापती सचिन किरपाल यांचेवर कौतुकांचा वर्षाव केला तर प्रकाश जाधव यांनी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला उच्चांकावर न्यायचे असल्याचे सांगितले.

तर राजेंद्र मुळक यांनी सभापती सचिन किरपान यांचे नेतृत्वात संचालक मंडळाने बाजार समितीमध्ये मोठा नफा घडवुन आणला व विविध विकासकामे केली तसेच सुनील केदारांना लढवय्ये नेत्याची उपमा त्यांनी दिली तसेच हे संचालक मंडळ यशस्वी ठरले असल्याचेही मुळक म्हणाले. यानंतर सभापती सचिन किरपान यांनी मी व माझ्या संचालक मंडळाने अवघ्या १० महिन्यातच बाजार समितीचे दुप्पटीने उत्पन्न वाढविले असुन आज कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असल्याचे ते बोलले.

यानंतर सरते शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री सुनील केदार यांनी आपल्या अर्धा एक तासाच्या भाषणात कित्येकदा सभापती सचिन किरपान तथा संचालक मंडळ यांच्या यशस्वितेबद्दल तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात भरघोस वाढ केल्याबद्दल कौतुक केले.

त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आपण पुन्हा जिंकु व प्रेम, विश्वास व आपुलकी हे आपल्या राजकारणाचं गणित असल्याचे ते बोलले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक त्रिलोक मेहर यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक, कार्यकर्ते, काँग्रेस चे विविध पदाधिकारी तथा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: