Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayवाघ वासराची शिकार करणार तेवढ्यात...गायीने १० सेकंदात वाघाला शिकवला धडा...Viral Video

वाघ वासराची शिकार करणार तेवढ्यात…गायीने १० सेकंदात वाघाला शिकवला धडा…Viral Video

Viral Video – सोशल मिडियावर आपल्याला अनेक जनावरांच्या कर्तबगारीचे, शौर्याचे Video बघायला मिळतात. तर असाच एक Video गाईच्या शौर्याचा सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, हा व्हिडिओ कॉर्बेट नॅशनल पार्कजवळील रिखानिखल ब्लॉकमधील पापडी गावातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या व्हिडीओत गुरे दिवसा उघड्यावर चरत असताना, त्याचवेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. ही घटना कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. यामध्ये वाघ मोकळ्या मैदानात वासराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पुढे काय होईल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. यामुळेच हे दृश्य पाहून लोक थक्क झालेत.

42 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, गायींचा कळप शेतात चरत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. सर्व गायी आपला जीव वाचवण्यासाठी धावतात. वाघ गाईच्या बछड्याला आपले लक्ष्य बनवतो आणि त्याचा पाठलाग करू लागतो. बछड्याची आई धावत येऊन वाघावर हल्ला करते आणि तो वासराला जमिनीवर टाकून त्याची विल्हेवाट लावणार होता…तेवढ्यात गाय मागून सुसाट येते आणि शिकारी वाघाला धुडकावून लावते. यामध्ये वाघ जीव वाचवून पळताना दिसतो. एवढेच नाही तर गाय….काही अंतरापर्यंत वाघाच्या पाठलाग करते.

हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी 22 एप्रिल रोजी ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितले की, ‘आता जगातील 75 टक्के जंगली वाघ भारतात आहेत, ज्यांची संख्या सुमारे 3200 आहे. ते लवकरच त्याच्या वहन क्षमतेपर्यंत पोहोचेल. मग आम्ही त्यांना मानवी वर्चस्व असलेल्या भागात कीटकांसारखे प्रजनन करू!’ ही बातमी लिहेपर्यंत IFS अधिकाऱ्याच्या या ट्विटला 2 लाख 41 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 2 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हा धक्कादायक व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स गाईच्या हिंमतीला सलाम करत आहेत, तर काही हे मातेचे प्रेम असल्याचे सांगत आहेत. इतर वापरकर्त्यांनी जंगले किंवा व्याघ्र प्रकल्पांची संख्या वाढवण्याबद्दल बोलले….

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: