विश्व संवाद केन्द्र विदर्भ प्रांत अमरावती यांचे आयोजन…
अकोला – विश्व संवाद केन्द्र अमरावती विदर्भ प्रांताच्या वतीने ‘देवर्षी नारद पुरस्कार’ यंदा ‘एबीपी माझा’चे अकोला जिल्हा प्रतिनिधी उमेश अलोणे आणि दैनिक सकाळ चे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सुरेन्द्र चापोरकर आणि यांना प्रदान करण्यात आला. स्थानिक व्यंकटेश लॉन येथील लक्ष्मी सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
विश्व संवाद केन्द्र अमरावतीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून आद्य पत्रकार देवर्षि नारद जयंती निमित्त दरवर्षी पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. अमरावतीच्या त्रिवेणी फाऊंडेशन यांच्या वतीने स्व. त्रिवेणीताई सुखदेवराव बोंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दैनिक सकाळचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सुरेन्द्र चापोरकर व प्रसिध्द नाटककार दिग्दर्शक लेखक आणि व्हिडीओ जर्नलिझम मध्ये आचार्य पदवी प्राप्त असलेले डॉ. चंद्रकांत रमेशचंद्र शिंदे यांच्या वतीने स्व. रमेशचंद्र शिंदे स्मृती पुरस्कार अकोला येथील एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी उमेश अलोणे यांना प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभागाचे प्रभारी माहिती उपसंचालक आणि जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार होते तर मातोश्री विमलबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ स्मिताताई देशमुख या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
नागपुर येथील प्रचार विभागाचे प्रसाद बर्वे हे प्रमुख वक्ता, विभाग संघ चालक चंद्रशेखरजी भोंदू संजय गुळवे, सुनिल सरोदे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सुनिल पाठक यांनी तर आभारप्रदर्शन राहूल गुल्हाने यांनी केले.
त्रिवेणी फाऊंडेशनच्या विश्वस्त डॉ. वसुधाताई बोंडे आणि डॉ. चंद्रकांत शिंदे यांच्यासह निमंत्रीत पाहुण्याच्या हस्ते दोन्ही पत्रकारांना प्रत्येकी ११ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील पाठक यांनी केले तर आभार प्राचार विभाग प्रमुख राहुल गुल्हाने यांनी मानले.