रामटेक – राजु कापसे
पुर्व पेंच व्याघ्र प्रकल्प सिल्लारी गेट येथे काल दिनांक ९ फेब्रुवारीला व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या रामटेक तालुका शाखेच्या सदस्यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. यादरम्यान जंगलातील विविध पशुपक्ष्यांसह वाघिणीने पत्रकारांचे लक्ष वेधले होते.
पूर्व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री राजुरकर यांनी काल दिनांक ९ फेब्रुवारीला व्हाईस ऑफ मीडिया संघटना शाखा रामटेक तालुकाच्या सदस्यांसाठी ‘ जंगल सफारी ‘ चे आयोजन केले होते. दरम्यान दुपारी ३ वाजतादरम्यान सिल्लारी गेट येथुन जंगल सफारी ला सुरुवात झाली. सफारीदरम्यान मोर, हरीन, काळविट, बारासिंगा, रानडुक्कर, कोल्हा यांचे सह विविध पक्षांनी पत्रकारांचे मन मोहुन टाकले होते.
असे असले तरी मात्र एकदा तरी बिबट किंवा वाघ दिसावा अशी पत्रकारांची प्रबळ इच्छा होती. या अभायारन्यात १९ वाघ तथा २३ बिबट असल्याची माहिती आहे. पत्रकारांची इच्छा पुर्ण करण्यासाठी गाईड तथा वाहन चालकाने संपूर्ण जंगल परीसर पिंजुन काढला तरी वाघ किंवा बिबट दिसुन येत नव्हता.
शेवटी एका ठिकाणी शिकारीच्या तयारीत असलेली पट्टेदार वाघीन दिसुन आल्याने पत्रकार मंडळींना मोठा हर्षोल्हास झाला. सायंकाळी ६ च्या सुमारास जंगल सफारी संपृष्टात आली. यावेळी व्हाईस ऑफ मिडीया संघटना शाखा रामटेक चे अध्यक्ष राजु कापसे, उपाध्यक्ष रुपेश वनवे, सरचिटनीस पंकज बावनकर, कार्याध्यक्ष रामरतन गजभिए, कोषाध्यक्ष प्रतिक डोंगरे,
कार्यवाहक महेंद्र दिवटे, संघटक नविन धमेजा, प्रसिद्धी प्रमुख सचिन चौरसिया, सदस्य प्रविन गिरडकर, सुरेंद्र बिरणवार यांचेसह , मौदा तालुका अध्यक्ष व्हाईस ऑफ मिडीया संदीप गौरखडे हे उपस्थित होते