Sunday, December 22, 2024
Homeराज्यपत्रकारांनी भरगच्च ‘गदिमा’ ठरले अधिवेशन ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार...

पत्रकारांनी भरगच्च ‘गदिमा’ ठरले अधिवेशन ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार…

व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन
१४ ठराव मंजूर, शासनाकडे करणार पाठपुरावा

रामटेक – राजु कापसे

रामटेक:- दोन दिवसापासून बारामती येथे सुरू असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशना चा समारोप झाला. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यासह १४ ठराव यावेळी मांडण्यात आले. हात उंचावून पत्रकारांनी भरगच्च असलेले “गदिमा सभागृह” या ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार ठरले!

या प्रसंगी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांच्यासह प्रदेश टीम, विभागीय अध्यक्ष, आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी संजय पडोळे यांनी ठराव वाचन या प्रसंगी केले. यात
१. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
२. रेडिओ टीव्ही सोशल मिडिया कर्मचाऱ्यांना श्रमिक पत्रकार मान्यता द्यावी.
३. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.
४. पत्रकार पाल्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी कोटा ठरवून द्या.
५. केंद्र डिजिटल मिडीयाच्या नोंदणी कायद्यात बदल करावे.

६. नियतकालिक नियमात बदल करावे.
७. १० वर्षे पत्रकारितेत काम करणाऱ्यांना वैद्यकीय उपचार मोफत मिळावे.
८. पत्रकारांचे वेतन मानधन याबाबत धोरण निश्चित करावे.
९. प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन व वसाहत निर्माण करावी.
१०. दहा वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी.
११. दैनिक व साप्ताहिकांना देण्यात येणारा जाहिरातींचे धोरण ठरवावे.
१२. शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबवावी.
१३. संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, यांचा समावेश होता. पत्रकारांच्या न्याय हककाच्या असलेल्या मागणीरुपी ठरावांना सर्वांनी हात उंचावून मंजुरी दिली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: