Sunday, December 22, 2024
Homeविविधपत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना इंडिया स्टार गौरव पुरस्कार २०२३ जाहीर...

पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना इंडिया स्टार गौरव पुरस्कार २०२३ जाहीर…

पुणे -: द रॉयल ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दिव्य राष्ट्रीय पुरस्कार इंडिया स्टार गौरव पुरस्कार 2023 हा पुणे येथील संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले यांना जाहीर झाला असल्याची माहिती रॉयल ग्रुप च्या सहअयोजिका आणि कोकण ब्रँड अम्बेसिडर दर्शना पाटील आणि रॉयल ग्रुप अध्यक्ष नितीन झगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून सुनिल ज्ञानदेव भोसले हे पत्रकारिकेत असून सामाजिक क्षेत्रांत कार्यरत आहे.

रॉयल ग्रुप चा हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा लवकरच पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. द रॉयल ग्रुप च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणार्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात येणार असल्याचे रॉयल च्या ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे- गायकवाड यांनी सांगितले . हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा पुणे चे यशस्वी आयोजक नितीन झगरे यांनी आयोजित केला आहे . या सोहळ्या साठी सर्व क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

सौंदर्यकन्या मी महाराष्ट्राची आणि सौभाग्यवती मी महाराष्ट्राची हा मॉडेलिंग शो आहे आणि या शो मध्ये पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळयासाठी विविध क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे .ज्यांना या पुरस्कार सोहळा आणि मॉडेलिंग जास्तीत जास्त स्पर्धकांनी या शो मध्ये सहभागी व्हावे अशी विनंती रॉयल च्या सह आयोजिका नमिताताई पाटील आणि श्री तानाजी कोरटकर ,एस.डी.आर फाऊंडेशन अध्यक्षा सीमा अनिल इंग्रोळे, श्वेता धामापुरकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: